Chhatrapati Shivaji Maharaj Dainik Gomantak
गोवा

हरमलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्पर्धांचे आयोजन

एकपात्री अभिनय स्पर्धेत पुनित तळवणेकर, स्वरा प्रथम

दैनिक गोमन्तक

पेडणे: शिवजयंती महोत्सवानिमित हरमल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पेडणे तालुका मर्यादित एकपात्री नाट्य अभिनय व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. एकपात्री अभिनय स्पर्धेत पुनीत तळवणेकर, स्वरा नाईक यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. वेशभूषा स्पर्धेत श्रीअंश सुभाजी, दिक्षीत सुभाजी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

शिवजयंती उत्सव समिती मांद्रे प्रभाग व युनायटेड बॉईज हरमल यांच्या संयुक्त विद्यामाने तीन दिवस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृतीचा रंगमंच तयार करण्यात आला होता.

पेडणे तालुक्यातील बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीने पूर्वप्राथमिक, प्राथमिक गटाला ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा तर पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक गटासाठी ऐतिहासिक सवेश एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती.

सविस्तर निकाल असा ः एकपात्री अभिनय स्पर्धा (माध्यमिक गट)ः पुनित तळवणेकर (प्रथम), आदिती सावळ देसाई (द्वितीय), आचल गाड (तृतीय). पूर्व माध्यमिक गट - स्वरा नाईक (प्रथम), सिद्धता आंबेकर (द्वितीय), चंद्रकांत सावंत (तृतीय). वेदिका तेली व आदिती तिळवे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

वेशभूषा स्पर्धा (प्राथमिक गट): श्रीअंश सुभाजी (प्रथम), सुरेखा किनळेकर (द्वितीय), पलक गडेकर (तृतीय). तर उत्तेजनार्थ बक्षिसे आरव नाईक, विक्रांती ठाकूर, रागिणी पेडणेकर, श्रुतिका पार्सेकर व शर्वी किनळेकर यांना देण्यात आली. पूर्वप्राथमिक गट - दीक्षित सुभाजी (प्रथम), हर्षिका गडेकर (द्वितीय), वर्धा शेटगावकर (तृतीय). तर उत्तेजनार्थ बक्षिसे प्रिया हरमलकर, रायशा पार्सेकर, अविनाश नाईक, साईशा नाईक आरोंदेकर आणि शनया गावडे यांना देण्यात आली. सलील पार्सेकर, संजय म्हामल यांनी स्पर्धा परीक्षण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT