Hit & Run Case  Dainik Gomantak
गोवा

Shirsai Accident: शिरसई ‘हिट अ‍ॅण्ड रन’प्रकरणी संशयित ट्रकचालकास अटक; जखमी दुचाकीस्वारावर गोमेकॉत उपचार सुरू

Goa Hit And Run: शिरसई येथे झालेल्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ अपघातातील संशयित ट्रकचालक मंजुनाथ संगाप्पा कोटागोंडा (२५, रा. बिजापूर-बेळगाव) यास कोलवाळ पोलिसांनी अखेर अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: शिरसई येथे झालेल्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ अपघातातील संशयित ट्रकचालक मंजुनाथ संगाप्पा कोटागोंडा (२५, रा. बिजापूर-बेळगाव) यास कोलवाळ पोलिसांनी अखेर अटक केली. या अपघातात जखमी दुचाकीस्वार मंदार मंगलदास धुरू (२२, रा. दाबोस - सत्तरी) यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

हा अपघात सोमवारी २१ रोजी पहाटे ३.२० च्या सुमारास शिरसई येथे कोमुनिदाद सभागृहासमोर घडला होता. जखमी मंदार धुरी हा जीए - ०४ - पी - ९१२९ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून म्हापशाहून अस्नोड्याच्या दिशेने जात होता. वाटेत घटनास्थळी अज्ञात ट्रकने विरुध्द दिशेने येत दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन बेशुध्दावस्थेत पडला. संशयित ट्रकचालकाने जखमीला वैद्यकीय उपचार न देता तसेच पोलिसांना घटनेची माहिती न देताच वाहनासमवेत घटनास्थळावरून पळ काढला होता.

या घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून जखमीला उपचारार्थ म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत दाखल केले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics Bhutani Project: भूतानी प्रकल्पावरुन राजकारण तापलं, ज्येष्ठ नागरिकांचे पाच दिवसापासून उपोषण; आक्रमक आलेमावांनी मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

Women's T20 Cricket: गोव्याच्या पोरी पुन्हा हारल्या! ओडिशानं 10 विकेट्सने नोंदवला दणदणीत विजय; माधुरी-सरीता जोडी चमकली

Goa Live Updates: APAAR कार्ड विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर; कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही: शैलेश झिंगाडे

गोव्यातील बेकायदा बांधकामे, सरकारी अनास्था आणि राजकीय आशीर्वादाचा खेळ

Goa Cyber Crime: फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्याने 35 लाखांना गंडा लावणारा केरळचा तरुण गजाआड; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

SCROLL FOR NEXT