Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : अपहरण करत पैसे लुटल्याचा गंभीर आरोप; दोघे अटकेत

संशयितांकडून पोलिसांनी एकूण 83 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : उत्तर गोव्यातील कोलवाळ येथे नेटवर्क सर्व्हेअरचे अपहरण आणि लुटीप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी हा सरकारी कर्मचारी आहे. पोलिसांनी संशयित मिलिंद नाईक (49 रा. हसापूर पेडणे) या सरकारी कर्मचाऱ्यासह प्रकेश शेटकर या 39 वर्षीय संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांकडून पोलिसांनी एकूण 83 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कोलवाळ पोलिसांनी आज सोमवारी लुटीच्या गुन्ह्यात 2 आरोपींना अटक केली आहे. म्हापशाचे SDPO जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार रामा गुप्ता नामक एका व्यक्तीचं दोघा संशयितांनी अपहरण करत त्याला कोलवाळ जेलजवळील निर्जन स्थळी नेलं. यावेळी त्यांच्या अन्य एका साथिदाराने स्विफ्टमधून घटनास्थळी येत त्याला कारमध्ये बसवलं. पीडित व्यक्तीकडून आरोपींनी तब्बल 83 हजारांची रक्कम आपल्या खात्यावर गुगल पेच्या माध्यमातून पाठवून घेतली.

पीडित व्यक्तीने तातडीने पोलिसात धाव घेत आपबीती कथन केली. पोलिसांनी सविस्तर तक्रार नोंद करुन घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. कोलवाळ पोलिसांनी 3 पथकं नेमून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन टॅबसह 83 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एकजण सरकारी कर्मचारी असल्याचंही समोर आलं आहे. आता या कर्मचाऱ्याविरोधात संबंधित खात्याला माहिती दिली जाणार असून त्याच्यावर खात्याअंतर्गत कारवाईही केली जाणार असल्याची माहिती जिवबा दळवी यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT