Assault Case Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून आणले गोव्यात, विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार; 18 वर्षाच्या तरुणाला अटक

Goa Crime News: गेल्या २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.३० वा.च्या सुमारास हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार थिवी येथील एका गेस्ट हाऊसच्या खोलीमध्ये घडला होता. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिला थिवीमध्ये आणले.

Sameer Panditrao

म्हापसा: लग्नाचे आमिष दाखवून सावंतवाडी येथील एका २२ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी संशयित भरत जंगले (१८, रा. नानोडा) याला अटक केली. डिचोली पोलिसांनी शून्य एफआयआर नोंद करून या प्रकरणात कारवाई केली.

गेल्या २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.३० वा.च्या सुमारास हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार थिवी येथील एका गेस्ट हाऊसच्या खोलीमध्ये घडला होता. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिला थिवीमध्ये आणले. तिथे घटनास्थळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर संशयिताने त्या महिलेला तिच्या लहान मुलासमवेत डिचोली तालुक्यातील एका भाड्याच्या खोलीत आणून ठेवले. मात्र, संशयित आपल्याशी लग्न करण्यास तयार नसल्याचे पाहून तिने मंगळवार, १२ रोजी डिचोली पोलिसांत धाव घेत, तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे डिचोली पोलिसांनी शून्य कलमान्वये गुन्हा दाखल केला.

हा लैंगिक अत्याचाराचा प्रथम गुन्हा कोलवाळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाल्यावर हे प्रकरण डिचोली पोलिसांकडून हस्तांतरित करण्यात आले. कोलवाळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला व बुधवार, १३ रोजी पहाटे संशयिताला पकडून त्यास अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सनी काणेकर हे करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्करोग रुग्णांसाठी दिलासा! आता तासनतास चालणारे उपचार अवघ्या 7 मिनिटांत होणार पूर्ण; 'रोश'ने भारतात लाँच केले नवीन इंजेक्शन

VIDEO: 9 वर्षांच्या चिमुरड्यानं पाकिस्तानी स्टारची काढली हवा, क्लीन बोल्डचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग

Goa Road Safety: खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करा! उगवेतील नागरिकांची मागणी, उदय महाले यांच्याकडून निवेदन सादर

Egg Prices: ब्रॉयलर अंडी पुन्हा महाग; ८० रुपये डझन; पुरवठा मुबलक; तरीही शंभर अंड्यांमागे शंभर रुपयांनी झाली वाढ

Viral Video: टिनशेड वाचवायला गेला अन् 50 फूट उंच हवेत उडून शेतात कोसळला, बरेलीतील थरार व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

SCROLL FOR NEXT