Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: ताजी हवा खाण्यासाठी थोडावेळ बाहेर काढलं, तेवढ्यात कैद्याने काढला पळ; मात्र...

प्रदीप खाल्को असे कैद्याचे नाव असून त्याच्याविरोधात म्हापसा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाल्याची माहिती SDPO जिवबा दळवी यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Colvale Jail: सतत वादाच्या भोवऱ्यात असलेले कोलवाळ कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारागृहातील एका कैद्याने तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. प्रदीप खाल्को असे कैद्याचे नाव असून त्याच्याविरोधात म्हापसा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाल्याची माहिती SDPO जिवबा दळवी यांनी दिली आहे.

माहितीनुसार...

जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना काल 3:10 वाजता घडली. प्रदीपला नवीन प्रवेश ब्लॉकमध्ये ठेवले होते. दरम्यान ताजी खाण्यासाठी कैद्यांना थोडावेळ बाहेर काढले जाते.

प्रदीप खाल्को हा आरोपी ट्रायल अंतर्गत आहे. याने या संधीचा फायदा घेत नवीन प्रवेश ब्लॉकच्या आतील कंपाऊंड भिंतीवर चढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने तळमजल्यावरील छताचा आणि गेटचा आधार घेतला होता.

मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि त्याला ताबडतोब पकडण्यात आले. दरम्यान तुरुंगाचे नियम मोडल्याप्रकरणी आणि पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT