Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: तपासणीला गेले अन् 'माल' घेऊन आले! कैद्यांचा गांजा तस्करीचा कट गोवा पोलिसांनी हाणून पाडला; 344 ग्रॅम गांजा जप्त

Colvale Jail Ganja Smuggling: गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही दोन अंडरट्रायल कैद्यांनी चपलांमध्ये गांजा लपवून अमली पदार्थांची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Colvale Jail Ganja Smuggling: गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही दोन अंडरट्रायल कैद्यांनी चपलांमध्ये गांजा लपवून अमली पदार्थांची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. मात्र, आयआरबी (IRB) पथकाच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला असून दोन्ही संशयितांना रंगेहात पकडण्यात आले आहे. दिलीप साहा आणि मोहम्मद सलमान अशी या संशयित कैद्यांची नावे असून, त्यांच्या या कृत्यामुळे कारागृह प्रशासनात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित कैदी दिलीप साहा आणि मोहम्मद सलमान यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) नेण्यात आले होते. रुग्णालयातील तपासणी आटोपल्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात पुन्हा कारागृहाकडे आणले जात होते. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर नियमानुसार आयआरबीच्या पथकाने त्यांची सखोल झडती घेण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांना त्यांच्या हालचालींविषयी संशय आला. बारकाईने तपासणी केली असता, या कैद्यांनी आपल्या पायात घातलेल्या चपलांमध्ये अतिशय शिताफीने गांजा लपवल्याचे दिसून आले.

झडती दरम्यान दोन्ही कैद्यांच्या ताब्यातून एकूण 344 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. कारागृहासारख्या उच्च सुरक्षा असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे गांजा नेण्याचा प्रयत्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रुग्णालयातून परतताना त्यांच्याकडे हा अमली पदार्थांचा साठा कोणी दिला किंवा त्यांनी तो कोठून मिळवला, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल घेत कोलवाळ पोलिसांनी दिलीप साहा आणि मोहम्मद सलमान यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे.

कारागृहातील कैद्यांकडून होणारे असे प्रयत्न सुरक्षा दलांसाठी एक मोठे आव्हान ठरत आहेत. यापूर्वीही कोलवाळ कारागृहात मोबाईल फोन आणि अमली पदार्थ सापडल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे आता बाहेरील तपासणीसाठी नेल्या जाणाऱ्या कैद्यांवर अधिक कडक नजर ठेवली जात आहे. या कारवाईमुळे आयआरबी पथकाचे कौतुक होत असले तरी, रुग्णालयात नेल्यानंतर तिथे सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्या होत्या का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, हे लवकरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी' म्हणजे देश अस्थिर करणाऱ्यांची ‘बी-टीम’, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार!

Chandra Gochar 2026: मानसिक शांतता आणि ऐश्वर्याचा मिलाफ! 5 राशींना मिळणार बँक बॅलन्स वाढवण्याची सुवर्णसंधी; महालक्ष्मीची कृपा

ICC Womens T20 Ranking: 12 महिन्यांचा प्रवास अन् ऐतिहासिक शिखर! भारताची 21 वर्षीय एन श्री चरणी बनली जगातील नंबर-1 टी-20 गोलंदाज

Benjamin Netanyahu vs Donald Trump: ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर! 'आम्ही कोणाच्या इशाऱ्यावर चालत नाही'; नेतन्याहूंचा थेट पलटवार VIDEO

दोन महिन्यांचं लिव्ह-इन रिलेशनशिप अन् 3 खून! बॉयफ्रेंडच्या मदतीनं तरुणीनं आई-वडिल अन् लहान बहिणीचा काढला काटा; बंगळुरु हादरलं

SCROLL FOR NEXT