Goa Drug Racket Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Colvale Jail Drug Case: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील बहुचर्चित ड्रग्स तस्करी प्रकरणात पोलिसांचा फास दिवसेंदिवस आवळत चालला असून, या रॅकेटमधील अंडर ट्रायल कैदी योगेश मांद्रेकर याला कोलवाळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील बहुचर्चित ड्रग्स तस्करी प्रकरणात पोलिसांचा फास दिवसेंदिवस आवळत चालला असून, या रॅकेटमधील अंडर ट्रायल कैदी योगेश मांद्रेकर याला कोलवाळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात अटक केलेला योगेश हा तिसरा संशयित आहे.

यापूर्वी गोवा मानव संसाधन विकास महामंडळाची (जीएचआरडीसी) सुरक्षा रक्षक आशा चोडणकर आणि कैदी रोविना लोबो यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रोविनाच्या चौकशीत निष्पन्न झालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाच्या परवानगीनंतर आज (ता. २५) दुपारी न्यायालयीन कोठडीत असलेल्या योगेशला ताब्यात घेत अधिकृत अटक दाखविली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणात सामील असलेल्या आणखी एका संशयित कैद्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात सुधारित अर्ज सादर केला आहे.

हे संपूर्ण ड्रग्स रॅकेट १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.१० च्या सुमारास उघडकीस आले होते. सुरक्षा रक्षक आशा चोडणकर ही कर्तव्यावर हजर होण्यासाठी जेलमध्ये प्रवेश करत असताना मुख्य प्रवेशद्वारावरील ‘फ्रिस्किंग पॉईंट’वर आयआरबी जवानांनी तिची झडती घेतली. यावेळी तिच्या थर्मासमधून २३६ ग्रॅम गांजा आणि २ ग्रॅम चरस, असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता.

इतकेच नव्हे, तर तिच्या लॉकरच्या झडतीत तीन मोबाईल फोन आणि तीन एटीएम कार्डेही पोलिसांच्या हाती लागली. याप्रकरणी कारागृह अधीक्षक सुचिता देसाई यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘एनडीपीएस’ कायद्यासह ‘भारतीय तुरुंग कायदा’ कलम ४२ अंतर्गत गुन्हा नोंदवून आशाला तत्काळ अटक केली होती.पोलिस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश घाडी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

तपासादरम्यान आशाने दिलेल्या माहितीवरून कैदी रोविना लोबो हिचा सहभाग समोर आला आणि तिला २२ ऑगस्ट रोजी अटक केली. सध्या आशाची सशर्त जामिनावर सुटका झाली असून, रोविना न्यायालयीन कोठडीत आहे.

कोलवाळ तुरुंगातील फाेटो ‘इन्स्टाग्राम’वर

करंझाळे - पणजी येथील एका हाणामारी प्रकरणानंतर कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या काही तरुणांनी ‘इन्स्टाग्राम’वर तुरुंगातील फोटो पोस्ट केले आहेत. ते समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. त्यामुळे तुरुंगात मोबाईलचा बिनधास्त वापर होत असल्याची चर्चा लोकांत सुरू आहे. कारागृहातील ड्रग्स नेटवर्कमध्ये आणखी काही कैद्यांची नावे समोर येत असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

कारागृहातील या प्रकरणात थेट भेट देऊन सविस्तर अहवाल देण्याची सूचना पोलिस महासंचालकांना केली आहे. कारागृहाची सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडे असल्याने त्यांच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT