Sessions Court |Goa News Dainik Gomantak
गोवा

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

South Goa District and Sessions Court: या प्रकरणात सरकारी वकील उत्कर्ष आवडे यांनी एकूण 9 साक्षिदारांची साथ सादर करून संशयिताचा गुन्हा सिद्ध केला.

सुशांत कुंकळयेकर

South Goa District and Sessions Court

कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंग याला दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज शुक्रवारी तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्या शिवाय त्याला दहा हजारांचा दंडही सुनावला आहे. तो न भरल्यास आरोपीला तीन महिन्यांची अतिरिक्त साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.

दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने संशयिताला दोषी ठरविले . कोलवा पोलिसांनी संशयिताला वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक केली होती.

या प्रकरणाची माहिती अशी की कोलवा वाहन पार्किंगच्या जागी किनाऱ्या जवळ कोलवा पोलिसांनी टाकलेल्या धाडी वेळी हा वेश्याव्यवसायाचा प्रकार उघड‌कीस आला होता.

यावेळी पोलिसांनी एक खोटे गिन्हाईक पाठवून आरोपी विजय सिंग याला वेश्याव्यवसायासाठी दोन मुलींना पुरविण्यासाठी आणले असता त्याला रंगेहात पकडले होते.

या प्रकरणात सरकारी वकील उत्कर्ष आवडे यांनी एकूण ९ साक्षिदारांची साथ सादर करून संशयिताचा गुन्हा सिद्ध केला. या साक्षीत पिडीत युवतीच्याही साक्षिचा समावेश होता.

त्याचप्रमाणे बायलांचो एकवट या बिगर सरकारी संघटनेच्या सदस्या डॉरीटी रॉड्रिगिज, दक्षिण गोव्याचे तत्कालिन उपजिल्हाधिकारी विशाल कुंडईकर यांचीही साक्ष पेश करण्यात आली होती.

या गुन्हयाचा तपास कोलवा पोलिस स्थानकाचे तत्कालिन पोलिस निरिक्षक नेक्सन कुलासो यांनी केला होता. सरकारी अभियोक्ता उत्कर्ष आवडे यांनी पक्षा तर्फे खटला लडविला.

दरम्यान या संशयिताला अटक करून त्याला शिक्षा होईपर्यंत या प्रकरणी पाठपुरावा केल्याने बायलांचो एकवोटच्या अध्यक्ष आवदा विएगस यांनी कोलवाचे तत्कालीन निरीक्षक मेल्सन कुलासो यांचे अभिनंदन केले असून हल्लीच्या काळात अशा प्रकरणात झालेली ही तिसरी शिक्षा असल्याचे त्यानी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT