Police Dainik Gomantak
गोवा

Goa Theft: वाढत्या घरफोड्या! कोलवा पोलिस तपासासाठी उत्तरप्रदेशात; लवकरच संशयित जाळ्यात सापडण्याची शक्‍यता

Goa Crime: मागच्या महिन्यात कोलवा पोलिसांनी घरफोडी प्रकरणांचा छडा लावताना उत्तरप्रदेश राज्यातील सराईत चोरटा पप्पूपाली ऊर्फ संतोष पाल (४३) याला जेरबंद केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: घरफोडी प्रकरणी संशयितांच्या शोधात कोलवा पोलिस सध्या उत्तरप्रदेशात ठाण मांडून आहेत. पोलिसांच्या हाती काही महत्त्‍वाचे धागेदोरे लागले असून, लवकरच संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडण्याची शक्‍यता आहे.

मागच्या महिन्यात कोलवा पोलिसांनी घरफोडी प्रकरणांचा छडा लावताना उत्तरप्रदेश राज्यातील सराईत चोरटा पप्पूपाली ऊर्फ संतोष पाल (४३) याला जेरबंद केले होते. उत्तर प्रदेशात राजपुरा येथे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. कोलवा पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल खाजनेकर व अन्य पोलिसांनी ही कामगिरी केली होती.

पोलिसांनी पप्पूपाली याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या अन्य साथीदारांची नावे उघड केली होती. त्यांना अटक करण्यासाठी कोलवा पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशात पाठवून देण्यात आले आहे. एकूण सहा चोरी प्रकरणात संशयित पाल व त्याच्या साथीदारांचा सहभाग असून, पाल याच्याकडून पोलिसांनी एक ॲक्टिवा स्कूटर पोलिसांनी जप्त केली होती. दरम्‍यान, पाल याच्यावर भारतीय न्यायदंड संहितेच्या ३३१ (४), ३०५ कलमाखाली संशयितांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू आहे.

चोरीच्‍या अनेक प्रकरणांत हात!

४ ऑगस्ट रोजी सेकंडवॉर्ड कोलवा येथे एका घरात चोरीची घटना घडली होती. यात चोरट्याने सोन्याचे दागिने, मनगटी घड्याळ, विदेशी चलन मिळून १ लाख ५० हजारांचा ऐवज लुटला होता. या प्रकरणी घरमालक सी. एफ. सेवेरिनो यांनी कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. सुरावली येथे घरफोडी करून १ लाख ९० हजारांचा ऐवज तर पुलवाडा बाणावली येथे एका घरात चोरी करून २ लाखांचा ऐवज लंपास केला होता. तसेच सेकंडवॉर्ड कोलवा, कावोरी चांदर व पेर सुरवाली येथे घरात चोरीचा प्रयत्‍न केला होता. या सर्व प्रकरणांत पाल व त्याच्या साथीदारांचा सहभाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT