Colva Police with Suspect  Dainik Gomantak
गोवा

Colva Police: गुन्ह्याची कबुलीसाठी डोके भादरले, नख उपटले! कोलवा पोलिसांवर आरोप

Goa Crime: पार्किंगच्या वादातून झालेल्या हल्लाप्रकरणातील प्रमुख संशयिताकडून गुन्हा वदवून घेण्यासाठी त्याला जबर मारहाण केली अशी तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्‍या एका प्रकरणात कोलवा पोलिस स्थानकातील एका उपनिरीक्षकाने घटनास्थळी जाऊन एका महिलेला मारहाण करून आपले बूट चाटायला लावले असा आरोप झाल्यानंतर हे पोलिस स्थानक वादाच्‍या भोवऱ्यात सापडले होते.

या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पुन्हा हेच पोलिस स्थानक आता आणखी एका प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. एका संशयिताकडून गुन्हा कबूल करून घेण्यासाठी थर्ड डिग्रीचा वापर करताना त्याच्या डोक्यावरील केस भादरल्याची तसेच पायाच्‍या अंगठ्याचे नख उपटून काढल्‍याची तक्रार केली गेली आहे.

बाणावली येथे पार्किंगच्या वादातून झालेल्या खुनी हल्लाप्रकरणातील प्रमुख संशयित टायसन ऊर्फ नासीर मसूद (२२) याच्या तोंडून त्याचा गुन्हा वदवून घेण्यासाठी कोलवा पोलिसांनी त्याला जबर मारहाण केली, अशी तक्रार आज संशयिताने मडगाव न्यायालयात केली.

या कथित हल्ल्यात जी शस्त्रे वापरली गेली, ती कुठे ठेवली आहेत याची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी पोलिस स्थानकात चक्क माझ्‍या डोक्यावरील केस भादरले. एवढेच नव्हे तर पायाच्या अंगठ्याचे नखही उपटून काढले, असे त्याने सांगितले.

२६ जुलै रोजी बाणावली येथील दांडो मैदानावर हा खुनी हल्ला झाला होता. टायसन आणि त्याच्या साथीदारांनी मायकल सिद्धी आणि सय्यद अली या दोघांवर दांडे, सुरी आणि लोखंडी सळ्‍या घेऊन हल्ला केल्याचा आरोप असून त्यात सय्यद अली हा जबर जखमी झाला होता.

या प्रकरणात कोलवा पोलिसांनी २७ जुलै रोजी टायसन आणि त्याचा साथीदार शंकर सिलीकत्यार या दोघांना अटक केली होती. तर अन्य तीन संशयित फरार झाले होते.

तक्रारीबाबतचा निर्णय लवकरच; ॲड. कुंकळयेकर

यासंबंधी संशयितांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात उपस्‍थित असलेले ॲड. माधव कुंकळयेकर यांनी पोलिसांनी क्रूरपणे मारहाण केल्याची तक्रार आपल्या अशिलाने न्यायालयासमोर केल्याचे मान्य केले. ही मारहाण एका पोलिस अधिकाऱ्याने केली होती. मात्र यासंबंधी अजून आपल्या अशिलाने कोणाच्याही विरोधात अधिकृत तक्रार दिलेली नाही. यासंबंधीचा निर्णय नंतर घेण्यात येईल.

संशयित न्‍यायालयात कोठडीत

दोन्‍ही संशयितांचा पोलिस कोठडी रिमांड संपल्यानंतर मडगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साबिनो ब्रागांझा यांच्यासमोर रिमांडसाठी आणले असता टायसन याने पोलिसांनी आपल्‍याला बेदम मारहाण केल्याची तक्रार केली. दरम्‍यान, न्या. ब्रागांझा यांनी पोलिस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहण्याची गरज व्यक्त केली. नंतर दोन्ही संशयितांना परत पोलिस कोठडीत न पाठविता न्यायालयीन कोठडीत पाठविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT