Colva massage fraud case Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'बॉडी मसाज' करून घेणं भोवलं; मुंबईच्या तरुणाला 32 वर्षीय महिलेनं 'गंडवलं'

Colva Body Massage Fraud: बॉडी मसाजच्या नावे मुंबईतल्या घाटकोपर येथील एका २५ वर्षीय युवकाला गंडा घालण्याची घटना कोलवा येथे घडली

Akshata Chhatre

मडगाव: बॉडी मसाजच्या नावे मुंबईतल्या घाटकोपर येथील एका २५ वर्षीय युवकाला गंडा घालण्याची घटना कोलवा येथे घडली. फसलेल्या त्या युवकाने नंतर कोलवा पोलिस ठाण्यात याबाबत रितसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी संध्या खातून (वय ३२ वर्षे) या महिलेवर गुन्हा दाखल केला. ती मूळ तेलंगणा राज्यातील आहे.

भारतीय न्याय संहितेच्या ३१९ (२) व ३१८ कलमाखाली पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजू वंटमुरी पुढील तपास करीत आहेत. अर्पव साधू हा तक्रारदार आहे.

शनिवारी संशयिताने त्याला प्रोफेशनल मसाज करण्याचा व्यवसाय असून, त्याबाबत आपल्याकडे रितसर प्रमाणपत्र असल्याचे सांगून मसाजसाठी ७ हजार रुपये शुल्क असल्याचे सांगितले. मागाहून साधू हा मसाजसाठी राजी झाला. चौकशीत त्याला संशयिताकडे कुठलेही प्रमाणपत्र नसल्याचे आढळले. तसेच तिने आधीची फी वाढवून २० हजार रुपये देण्यास सांगितले. हे शुल्क तिने ‘जीपे’द्वारे आपल्या खात्यात जमा केले. फसगत झाल्याने मागाहून अर्पव यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आमका नाका मोबईल टॉवर! सरकारी प्राथमिक शाळेजवळ टॉवर नकोच

Balli Sarpanch: पारोडानंतर बाळ्ळी पंचायतीवरही भाजपचे वर्चस्व, हर्षद परीट झाले सरपंच

राजस्थानी तरुणाला हडफडे येथे अज्ञाताकडून जबर मारहाण; गॅस सिलिंडर अफरातफरीचा केला होता आरोप

Dussehra 2025 Wishes In Marathi: आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेऊनी आली विजयादशमी...प्रियजनांना पाठवा दसऱ्याच्या मराठीतून शुभेच्छा

Viral Video: महिलेची हातचलाखी, ज्वेलरी शॉपमधून चोरी केला सोन्याचा महागडा नेकलेस, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT