Balli Sarpanch: पारोडानंतर बाळ्ळी पंचायतीवरही भाजपचे वर्चस्व, हर्षद परीट झाले सरपंच

Balli Panchayat Election: भाजपचे हर्षद परीट यांनी काँग्रेसचा पाठिंबा असलेल्या महेंद्र वेळीप यांच्यावर ५ विरुद्ध ४ मतांनी विजय मिळवीत या पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला.
Goa local body election news
Balli Panchayat BJP dominanceDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: कुंकळ्ळी आणि केपे या दोन्ही मतदारसंघांशी संबंधित असलेल्या पारोडा पंचायतीवर काल भाजपने पुन्हा सत्ता काबीज केलेली असतानाच आज बुधवारी बाळ्ळी पंचायतीवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

बुधवारी (०१ ऑक्टोबर) झालेल्या सरपंच निवडीत भाजपचे हर्षद परीट यांनी काँग्रेसचा पाठिंबा असलेल्या महेंद्र वेळीप यांच्यावर ५ विरुद्ध ४ मतांनी विजय मिळवीत या पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला. परीट हे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे समर्थक असून त्यांच्या निवडीबद्दल कवळेकर यांनी त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांचे अभिनंदन केले.

Goa local body election news
राजस्थानी तरुणाला हडफडे येथे अज्ञाताकडून जबर मारहाण; गॅस सिलिंडर अफरातफरीचा केला होता आरोप

यावेळी कुंकळ्ळीचे माजी आमदार क्लाफास डायस, कुंकळ्ळीचे नगरसेवक विदेश देसाई तसेच सुदेश भिसे हे उपस्थित होते.

पारोडा आणि बाळ्ळी या दोन्ही पंचायतींवर भाजपने विजय मिळविल्याने या दोन्ही पंचायती काँग्रेसच्या हातातून निसटल्या असून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्यासाठी हा फटका असल्याचे सिद्ध झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com