Colva Gang War Dainik Gomantak
गोवा

Colva Gang War: दक्षिण गोव्यावर वर्चस्व कोणाचे? 'वॉल्टर' आणि 'तलवार' गँगमधील संघर्षातून कोलव्यात जीवघेणा हल्ला; मुख्य संशयितासह चौघे अटकेत

Goa Crime News: कोलवा येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे ‘वॉल्टर’ आणि ‘तलवार’ या दोन गँगमधील वर्चस्वाचा संघर्ष असल्याचे समोर आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: कोलवा येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे ‘वॉल्टर’ आणि ‘तलवार’ या दोन गँगमधील वर्चस्वाचा संघर्ष असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील वॉल्टर गँगचा फरार मुख्‍य संशयित शंकर शिल्लिक्याथार (२२, रा. बेळगाव) याला कोलवा पोलिसांनी काल रात्री बेळगाव येथून अटक केली. आतापर्यंत अटक केलेल्या संशयितांची संख्या चार झाली आहे.

अटक करण्यात आलेले चारही संशयित ‘वॉल्टर’ गँगचे असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेला रसूल खान हा ‘तलवार’ गँगचा सदस्य असल्याचेही समोर आले आहे. दक्षिण गोव्यावर कोणाचे वर्चस्व असावे, या मुद्यावरून या दोन्ही गँगमध्‍ये यापूर्वीही अनेकदा संघर्ष झाला आहे.

१५ नोव्हेंबर रोजी रात्री कोलवा येथील पेट्रोलपंपाजवळ हा हल्ला झाला होता. तलवार गँगचा सदस्य रसूल खान हा ऑम्लेट खाण्यासाठी एका गाड्यावर आला असता, वॉल्टर गँगच्या पाचजणांनी त्याच्यावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणातील पाच संशयितांपैकी चौघांना अटक करण्यात आली असून एक संशयित अद्याप फरार आहे.

हल्ल्यानंतर मुख्य संशयित शंकर फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी कोलवा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर काल रात्री कर्नाटकात जाऊन सापळा रचत बेळगाव येथून त्याला ताब्यात घेतले. सखोल तपास सुरू आहे.

ऑगस्ट २०२५ मध्ये मुंगूल येथे मोठा हल्ला

दक्षिण गोव्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या मुद्यावरून मडगाव ते कोलवा, बाणावली परिसरात यापूर्वीही अनेकदा गँगमधील संघर्ष उफाळून आला आहे. या संघर्षातील सर्वांत मोठा हल्ला ऑगस्ट २०२५ मध्ये मुंगूल येथे झाला होता. त्या हल्ल्यातही वॉल्टर गँगचा हात असल्याचे सांगितले जाते. प्रतिस्पर्धी गटात रसूल खान आणि सध्याच्या कोलवा हल्ल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणारा त्याचा भाऊ मलिक शेख यांचा समावेश होता. मुंगूलमधील घटनेनंतरही दोन्ही गटांमध्ये छोटे-मोठे हल्ले सुरूच होते. त्यामुळे दक्षिण गोव्यातील या टोळ्यांमधील संघर्षाची तीव्रता कायम असल्याचे दिसून येते.

बाणावलीचा वचपा?

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बाणावली येथील पार्किंगच्या जागेत या दोन गटांतील गुंडांमध्ये हल्ल्याची घटना घडली होती. त्याचाच वचपा काढण्यासाठी कोलवा येथे रसूल खानवर हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न'; CM सावंत यांचा विरोधकांवर आरोप

Goa Government Decision: गोव्यात दुकाने, मॉल्स आता 24 तास सुरू राहणार! सरकारचा मोठा निर्णय; 3 वर्षांसाठी परवानगी

भारताने तुर्कीची केली बोलती बंद! आंतरराष्ट्रीय मंचावर पोलखोल करत सुनावले खडे बोल; UN मधील राजनैतिक संघर्ष शिगेला VIDEO

MS Dhoni IPL Retirement: कॅप्टन कूलचा आयपीएलला अलविदा! CSK ने ‘थाला’ वर सोपवली मोठी जबाबदारी

Jeffrey Epstein Death: जेफ्री एपस्टीनचा मृत्यू आत्महत्या नव्हे, तर खून होता! 7 वर्षांनंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ; पाठीमागून हल्ला करुन गळा आवळल्याचा संशय

SCROLL FOR NEXT