Coconut in goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात नारळाची किंमत झाडापेक्षा उंच

नारळ गोव्यातील जनतेचा रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला असून सध्या हाच नारळ बाजारातून गायब झाल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

केपे: गोवेकरांच्या (Goa) आवडीचा व ज्याच्याशिवाय जेवणाचे पदार्थ बनतच नाही, त्या नारळाची किंमत ऐन सणासुदीच्या दिवसात गगनाला भिडली असल्याने लोकपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. श्रावण महिन्यात हिंदूंचे बरेच सण साजरे होत असल्याने नारळाच्या किमतीने लोकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. उत्पादन कमी झाले असून पाडेलीही मिळत नाहीत. त्यामुळे बागायदाराबरोबरच सर्वसामान्यांनाही फटका बसत आहे.

नारळ गोव्यातील जनतेचा रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला असून सध्या हाच नारळ बाजारातून गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन वर्षात कोविड महामारीमुळे लोकांचे जीवन जगणे मुश्कील बनले असून त्यात सामान्य वस्तूंच्या किमती वाढल्याने गरीब जनतेचे हाल झाले आहेत. गणेश चतुर्थी तोंडावर येऊन ठेपली आल्याने लोकांनी आत्तापासून खरेदीला सुरुवात केली आहे. पण बाजारात नारळाच्या किमती वाढल्याने सण कसे साजरे करावे, असे लोकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविवारी केपे व कुडचडे बाजार मोठ्या प्रमाणात भरतो, पण या बाजारात नारळ विक्री करणाऱ्या विक्रेते बरेच कमी झाल्याचे दिसून येते.

प्रवेश प्रभुगावकर म्हणाले, राज्यात नारळ पीक घेणे जिकिरीचे काम बनले असून हा व्यवसाय नकोसा झाला आहे. सध्या या बागायतीत काम करण्यासाठी दिवसाकाठी एका कामगाराला किमान आठशे ते एक हजार रुपये मोजावे लागतात त्याचप्रमाणे माडावर चढण्यासाठी पाडेली भेटत नसल्याने बराच त्रास होत आहे. सध्या एका पाडेल्यासाठी दिवसाला दोन हजार रुपये द्यावे लागतात या कारणाने नारळाची बागायती करणे बरेच खर्चीक काम आहे. चार वेळा काढणारे नारळ आता फक्त मार्च व डिसेंबर महिन्यातच काढले जात असल्याने बाजारात नारळाची मोठ्याप्रमाणात कमतरता दिसून येते व याचा त्यांच्या किमतीवरही झाली आहे. मार्च महिन्यात जो नारळ काढलेला नारळ सध्या बाजारात उपलब्ध असून आता नारळाच्या किमती उतरण्यासाठी ऑक्टोबर महिन्याची वाट पहावी लागेल.

उत्पादनावर परिणाम

नारळ बाजारातून गायब झाला नाही, तर नारळाच्या पिकावर गेल्या काही वर्षात मोठा परिणाम आहे. प्रत्येक ठिकाणी दूरध्वनी मनोरे उभारले असून त्यातून सुटणाऱ्या लहरीमुळे फक्त नारळावरच नाही, तर आंबा सुपारी आशा अनेक पिकावर झाल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी नारळ वर्षातून चार वेळा माडावरून काढला जायचा, पण आता फक्त दोनच वेळा काढला जात आल्याचे बागायतदार शेखर कुंकळकर यांनी सांगितले.

नारळाचा दर रू. 20 ते 30

केपे व कुडचडे बाजारात साधारण नारळाची किंमत वीस तर मोठ्या नारळाची किंमत तीस रुपये होती. बाजारात येणारे लोक नारळाच्या किमती ऐकूनच बाजूला सरकत असल्याचे चित्र दिसून येत होते. सध्या नारळ मिळणे मुश्कील बनले असून घाऊक बाजारात नारळाची किंमत बावीस ते पंचवीस रुपये असल्याने आम्ही लोकांना कसे विकावे, तेच कळत नाही, असे देवेंद्र नाईक या विक्रेत्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT