Goa Illegal Fishing Canva
गोवा

Illegal Fishing: बेकायदा मासेमारी कशी रोखणार? गस्तीसाठी पोलिसांकडे एकच जीर्ण बोट

Goa Coastal Police: पोलिस परप्रांतीय ट्रॉलर्सना रोखू शकत नसल्याने स्थानिक मच्छीमारांना जीव धोक्यात घालून त्यांना हाकलून लावण्यासाठी समुद्रात धाव घ्यावी लागते

गोमन्तक डिजिटल टीम

Goenchea Ramponkarancho Ekvott

मडगाव: एका बाजूने मलपे-कर्नाटक येथील ट्रॉलर्सवाले गोव्याच्या समुद्रहद्दीत घुसून बेकायदा मासेमारी करून हैदोस घालत असताना त्यांना रोखणे ज्यांचे काम आहे, त्या सागरी किनारपट्टी पोलिसांकडे फक्त एकच बोट आहे. तीसुद्धा जीर्ण व खवळलेल्या समुद्रात जाण्यासाठी योग्य नसल्याने या परप्रांतीय मच्छीमारांची मनमानी सुरूच आहे.

पोलिस या परप्रांतीय ट्रॉलर्सना रोखू शकत नसल्याने आता स्थानिक मच्छीमारांना आपला जीव धोक्यात घालून त्यांना हाकलून लावण्यासाठी समुद्रात धाव घ्यावी लागते, अशी माहिती ‘गोंयच्या रापणकारांचो एकवोट’ या संघटनेचे सरचिटणीस ओलेन्‍सियो सिमॉईशयांनी दिली.

यंदा गोव्यात मत्स्यदुष्काळ पडल्यासारखी स्थिती आहे. मच्‍छीमारांना दरवर्षी मिळणारी सुंगटेही यावेळी जाळ्यात सापडलेली नाहीत. त्‍यामुळे हे लोक अगोदरच चिंतेत आहेत. त्यात या परप्रांतीय मच्छीमारांची टोळधाड पडू लागल्याने त्यांच्याशी दोन हात कसे करावेत, ही नवी चिंता त्‍यांना भेडसावू लागली आहे.

ओलेन्‍सियो सिमॉईश (सरचिटणीस, ‘गोंयच्या रापणकारांचो एकवोट’)

आम्ही कोस्टल पोलिस आणि मुख्यमंत्री दोघांकडेही याबाबतीत साकडे घातले, पण त्याचा काहीच फायदा झालेला नाही. कर्नाटकातील मच्छीमार शस्त्रे घेऊनच मासेमारी करण्यासाठी येत असतात. त्यांना हाकलून लावण्यासाठी गोव्यातील मच्छीमार गेल्यास त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. याप्रश्‍‍नी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून किमान तटरक्षक दलाला गोव्यातील समुद्रात गस्त घालण्‍याचा आदेश द्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT