Sanqulim Crime Dainik Gomantak
गोवा

Sanqulim Crime: साखळीतील अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणात मदत केलेल्या दुसऱ्या कामगाराला अटक!!

Sanqulim Crime Latest News: अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणात सहआरोपीला पोलिसांकडून अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Sanqulim Murder Case Update

साखळी : विठल्लापूर साखळी येथे 11 वर्षीय अल्पवयीन मुलाचा रविवारी पहाटे खून करण्यात आला होता. समीर अली असे या मयताचे नाव असून डिचोली पोलिसांकडून त्वरित घटनेचा तपास सुरु झाला. प्राथमिक चौकशीतून पोलिसांना चंदू पाटील या आरोपीबद्दल माहिती मिळाली आणि कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचताच अवघ्या 6 तासांत पोलिसांनी त्याला अटक केली होती.

या प्रकरणातील आणखीन एक पान आता उघड झाले असून विठ्ठलापूर साखळी येथे समीर अली या मुलाच्या खुनप्रकरणात चंदू पाटीलला मदत केलेल्या भीम लालमण (मू. उत्तर प्रदेश) याला देखील डिचोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

प्रमुख संशयित चंदू याने माहिती उघड केल्यानंतर पोलिसांनी भीम या कामगाराला अटक केली आणि मिळालेल्या माहितीनुसार भीम लालमण सुद्धा चंदू सोबत डेअरीमध्ये काम करत होता.

अल्पवयीन मुलाची हत्त्या का?

मयत समीरचा सख्खा भाऊ डेअरीमध्ये काम करत होता, मात्र त्याने नोकरी सोडल्याने त्याच्या जागी चंदूची नेमणूक करण्यात आली होती. चंदूची अरेरावी डेअरी मालकाला सहन न झाल्याने त्याने समीरच्या भावाला पुन्हा कामावर येण्याची विनंती केली आणि यावेळी समीर देखील भावासोबत आला होता. चंदूने कामावरून काढण्याच्या संतापामुळे समीरची हत्या केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT