Noida Ghaziabad CNG Price Dainik Gomantak
गोवा

CNG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा झटका; सीएनजीच्या किमतीत पुन्हा वाढ! पाहा नवीन दर

Noida Ghaziabad CNG Price: सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणारा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किंमतींनंतर आता सीएनजी (CNG) च्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या खिशावर थेट 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

नवी दिल्ली:

सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणारा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किंमतींनंतर आता सीएनजी (CNG) च्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या खिशावर थेट 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. गॅस कंपन्यांनी सीएनजीच्या दरांमध्ये प्रति किलो १ रुपयाची वाढ जाहीर केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कंपन्यांनी दरांमध्ये २ रुपयांची वाढ केली होती.

या लागोपाठ झालेल्या दरवाढीमुळे दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. दिल्लीमध्ये ८० रुपयांचा टप्पा पार .या ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये आता एक किलो सीएनजीचा दर ८०.०९ रुपयांवर पोहोचला आहे. आधी २ रुपये आणि आता १ रुपया अशा लागोपाठच्या दरवाढीमुळे दिल्लीत कॅब, ऑटो आणि खाजगी गाड्या चालवणाऱ्या वाहनधारकांचे मासिक बजेट पार कोलमडले आहे. रोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांना आता प्रवासासाठी खिसा जास्त रिकामा करावा लागणार आहे.

नोएडा आणि गाझियाबादमध्ये दर सर्वाधिक

दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडा आणि ग्रेटर नोएडा भागातही सीएनजीच्या किमतीत १ रुपयाची वाढ झाली आहे. या वाढीनंतर नोएडामध्ये सीएनजीचा नवीन दर प्रति किलो ८८.७० रुपयांवर पोहोचला आहे, जो दिल्लीच्या तुलनेत खूप जास्त आहे. गाझियाबादमधील रहिवाशांनाही या महागाईतून कोणतीही सुटका मिळालेली नाही. तिथेही सीएनजीचे दर आता ८८.७० रुपये प्रति किलो झाले आहेत. गाझियाबाद आणि नोएडामध्ये राहणारे लाखो नोकरदार जे रोज नोकरीसाठी दिल्लीत ये-जा करतात, त्यांच्यासाठी हा दैनंदिन प्रवास आता चांगलाच खर्चिक ठरणार आहे.

वाहतूक भाडे आणि भाजीपाला महागण्याची शक्यता

सीएनजीच्या किमती सतत वाढत असल्याने आता दिल्ली-एनसीआरमधील ऑटो, ई-रिक्षा आणि ओला-उबरसारख्या कॅब संघटनांनी भाडेवाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. सर्वसामान्यांवर दुहेरी मार: व्यावसायिक वाहनांमध्ये सीएनजी महाग झाल्याचा थेट परिणाम मालवाहतुकीवर (Freight Charges) होतो. मालवाहतूक महागल्यामुळे येत्या काही दिवसांत बाजारात येणारी फळे, भाजीपाला आणि इतर किराणा मालाच्या किमतीही वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या दरवाढीचा फटका थेट गृहिणींच्या स्वयंपाकघराला बसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT