Manish Jadhav
Kia Carens CNG व्हेरिएंट 11.77 लाख (एक्स-शोरुम) किमतीत लॉन्च झाला. हा CNG किट डीलर-लेव्हलवर 77,900 मध्ये केवळ Premium (O) पेट्रोल व्हेरिएंटवर उपलब्ध असेल.
या शानदार कारमध्ये 1.5-लीटरचे एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून ते 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह येते.
सरकारमान्य Lovato DIO CNG किट बसवले आहे. यावर ३ वर्षे किंवा 1,00,000 किमीची थर्ड-पार्टी वॉरंटी मिळेल.
कॅरेन्सचा व्हीलबेस 2,780 मिमी असल्यामुळे आतमध्ये पुरेशी जागा आहे. यात सेमी-लेदर सीट्स आणि सर्व रांगेतील प्रवाशांसाठी एकूण 5 USB Type-C पोर्ट्स आहेत.
दुसऱ्या रांगेतील सीट्स 60:40 स्प्लिटसह स्लाइड, रिक्लाइन आणि टम्बल करता येतात, तर तिसऱ्या रांगेतील सीट्स 50:50 स्प्लिटसह पूर्णपणे फोल्ड करता येतात.
Keyless Entry, बर्गर अलार्म, रिअर-व्ह्यू कॅमेरा, मागील दरवाजांसाठी सनशेड पडदे आणि इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल ORVMs यांसारखी सुविधा देण्यात आल्या आहेत.
नवीन Carens CNG मध्ये 6 एअरबॅग्ज, ESC, VSM, HAC (हिल-असिस्ट कंट्रोल) आणि हायलाइन TPMS सह एकूण 10 मजबूत सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.