Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

उत्पल पर्रीकरांच्या उमेदवारीवर मुख्यमंत्र्यांचे थेट उत्तर

कॉंग्रेस आणि भाजपला राजनैतिक आव्हान देण्यासाठी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कॉंग्रेस आणि भाजपला राजनैतिक आव्हान देण्यासाठी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. या वाढत्या आव्हानामुळे सत्ताधारी भाजप 'बॅक फुटवर' जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Pramod Sawant on Utpal Parrikar Candidature)

दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "आम्ही मनोहर पर्रीकरांचे काम पुढे सुरू ठेवले आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही गोव्याचा विकास करत आहोत. कोविडकाळात मी लोकांबरोबर उभा आहे. मी तळागाळात जाऊन काम केले आहे. लोक भाजप बरोबर उभे आहेत."

यावेळेस त्यांनी आम आदमी पार्टी (AAP) आणि तृणमूल कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "त्या पक्षांनी स्वतच्या राज्यांकडे लक्ष द्यावे. ते इथे फक्त निवडणुकीसाठी आलेले आहेत. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दिल्लीच्या लोकांचे पैसे गोव्यात जाहिरतबाजी करण्यासाठी वापरत आहेत. त्यांनी आधी दिल्लीच्या तरुणांना पैसे द्यावेत. या पक्षांच्या आगमनामुळे काही मतदारसंघात कॉंग्रेचे नुकसान होईल, असे देखील त्यांनी नमूद केले.

उत्पल पर्रीकर यांच्या नाराजी नाट्यांवर बोलण्याचे सावंत यांनी टाळले. उत्पल पर्रीकर यांना भाजप उमेदवारी देणार का, असे विचारले असता त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पुढे केले. ते म्हणाले, पक्षाचे वरिष्ठ नेते उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवर निर्णय घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT