Two Days Chintan Shivir Goa Dainik Gomantak
गोवा

Chintan Shivir : सुशासनासाठी भाजपचे ‘चिंतन’; मंत्री, अधिकाऱ्यांमध्‍ये संवाद

दैनिक गोमन्तक डिजिटल

CM Pramod Sawant : राज्‍यातील प्रशासन हे सुशासित आणि सुनियोजितपणे चालावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून पुढे आलेले चिंतन शिबिर हे सध्‍या दक्षिण गोव्‍यातील बाणावली येथील ताज एक्‍झोटिका हॉटेलमध्‍ये सुरू झाले असून, आज सकाळी मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिबिराचे उद्‍घाटन केले.

सरकारातील मंत्री तसेच विविध खात्‍यांचे सचिव, अधिकारी यांच्‍यात समन्‍वय असावा आणि त्‍यानुसार राज्‍याची धोरणे आणि योजना पुढे राबवाव्‍यात या उद्देशाने हे शिबिर आयोजित केल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्‍या मंत्रीगणांना दिली.

मुख्‍यमंत्री सावंत यांच्‍याबरोबर या शिबिरात कृषिमंत्री रवी नाईक, महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पंचायतमंत्री माविन गुदिन्‍हो, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, नगरनियोजनमंत्री विश्‍‍वजीत राणे, जलस्रोत खात्‍याचे मंत्री सुभाष शिरोडकर, क्रीडामंत्री गोविंद गावडे, समाजकल्‍याण मंत्री सुभाष फळदेसाई, पोलीस महासंचालक जसपाल सिंग तसेच अन्‍य खात्‍यांचे सचिव उपस्‍थित होते.

त्रुटींचा मागोवा घेणार

सरकारच्‍या योजनांमध्‍ये काही त्रुटी असल्‍यास किंवा त्‍या राबविण्‍यात काही अडचणी येत असल्‍यास प्रत्‍येक मंत्री या शिबिरात आपले म्‍हणणे मांडणार असून, त्‍यानंतर चर्चा करून त्‍यासंबंधी काही तोडगा काढता येणे शक्‍य आहे का, यावरही या शिबिरात चर्चा केली जाणार आहे.

आयोजनामागील उद्देश असा...

  1. दोन दिवसांच्‍या शिबिरात राज्‍याच्‍या योजना प्रभावीपणे कशा राबवाव्‍यात आणि अंदाजपत्रकातील तरतुदी चांगल्‍यारितीने लोकांपर्यंत कशा पोहोचतील, यावर एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला जाणार आहे.

  2. योजना राबविण्‍यासाठी कोणकोणत्‍या खात्‍यांची एकमेकांना गरज लागते, तेही विचारात घेतले जाईल. या खात्‍यांमध्‍ये अंतर्गत समन्‍वय कशारितीने साधता येईल यावर चर्चा होत आहे.

  3. कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाला काय अपेक्षा आहेत आणि त्‍या पूर्ण कशा केल्‍या जातील, यावरही ऊहापोह होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT