Saint Francis Xavier Feast Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Feast: सायबाच्या फेस्ताची परबी!! बासिलिका भक्तीच्या सागरात बुडाली; मुख्यमंत्र्यांसह इतर पक्षनेते लावणार उपस्थिती

Old Goa Church Feast Celebration:आजच्या या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते, मंत्री आणि आमदार यांची उपस्थिती असणार आहेत

Akshata Chhatre

Saint Francis Xavier Feast, Old Goa

ओल्ड गोवा: गोंयचो सायब म्हणजेच सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे फेस्त मंगळवारी ३ डिसेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने जुने गोवे येथील बासिलिका ऑफ बॉ जीझस येथे साजरे केले जात आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव आणि धर्मगुरू विशेष प्रार्थनासभा घेणार आहेत. लुईस अँटोनियो टॅगले, प्रीफेक्ट ऑफ द डिकास्ट्री फॉर इव्हँजेलायझेशन, मुख्य अतिथी असणार आहेत आणि आजच्या या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते, मंत्री आणि आमदार यांची उपस्थिती असणार आहेत.

नऊ दिवसांच्या नोव्हेनानंतर फेस्त मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने साजरा केला जाईल. यंदाचे फेस्त विशेष असणार आहे, कारण यंदा दहा वर्षांनंतर गोव्यात शवप्रदर्शन सोहळा साजरा केला जातोय.

३ डिसेंबर १५५२ रोजी वयाच्या ४६ व्या वर्षी चीनला प्रवास करताना सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे त्यांच्या स्मृतिदिनी फेस्त साजरे केले जाते, अशी माहिती शवप्रदर्शन समितीचे निमंत्रक फादर हेन्री फाल्कांव यांनी दिली.

आज पहाटे ३.४५ वाजता प्रथम प्रार्थना सभा सुरू झाली आणि यानंतर सकाळी ५, ६, ७.१५, ८.३० आणि १०.३० वाजता इंग्रजीत विशेष प्रार्थना पार पडली. यानंतर दुपारी १२.१५, ३.३० आणि सायंकाळी ५ वाजता तसेच सायंकाळी ६.१५ वाजता दुसरी इंग्रजी प्रार्थना असणार आहे. यंदा फेस्त आणि शवप्रदर्शनाचा संदेश आम्ही ‘शुभ वार्ता’चे संदेशवाहक आहोत, असे ठेवण्यात आली असून जुने गोव्यात ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत, ज्यावर प्रमुख व्यक्तींची विधाने नमूद केली आहेत.

सुरक्षा व्यवस्था

शवप्रदर्शनासाठी अगोदरच सुमारे एक हजाराहून जास्त पोलिस जुने गोवा आणि सभोवतीच्या परिसरात तैनात केले गेले आहेत. सीसीटीव्ही, ड्रोन आणि टेहळणी बुरूज सारखी सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. अग्निशमन दल, आरोग्य सेवा आणि भाविकांच्या सोयीसाठी पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "गोव्यात येऊन मला आनंद झाला" पी. अशोक गजपती राजू (राज्यपाल)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT