CM Promod Sawant Gomantak Digital Team
गोवा

CM Pramod Sawant : म्हादईच्‍या मुद्यासह विविध ठराव मंजूर

भाजप कार्यकारिणी बैठक : सरकारचे कामकाज जनतेच्या हिताचे

गोमन्तक डिजिटल टीम

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आज राज्य भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध खात्याचे मंत्री, आमदार, पक्ष कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आणि विविध राजकीय ठरावही मंजूर करण्यात आले. म्हादई नदी ही गोव्याची जीवनरेखा आहे. केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकाच्या डीपीआरला दिलेल्या परवानगीविरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना बैठकीत पूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

साखळी व फोंडा पालिकेत भाजपने मिळविलेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषीमंत्री रवी नाईक यांच्या अभिनंदनचा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री सावंत यांनी सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करत सर्वसामान्यांच्‍या आशा-आकांक्षाना न्याय देण्याचे काम केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

खाणी सुरू करण्‍याच्‍या प्रयत्‍नांबाबत समाधान

भातशेती जमिनीची विक्री आणि रूपांतरावर कडक निर्बंध घालण्याच्या केलेल्या कायद्याबद्दल सरकारचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसी, एसटी, एससी उमेदवारांना आरक्षण देण्याची मागणी सातत्याने होत होती. ‘सबका साथ सबका विकास’ यानुसार पक्षाने ऐतिहासिक निर्णय घेऊन या घटकांना ४२ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला याबद्दलही सरकारचे अभिनंदन करण्यात आले.

खाण उद्योग लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. ज्या खनिज ब्लॉक्सचा यशस्वी ई-लिलाव झाला आहे, त्या तातडीने सुरू कराव्यात यासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

SCROLL FOR NEXT