Goa CM Pramod Sawant News Dainik Gomantak
गोवा

राज्यातील बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी नवीन कायद्याची गरज: CM प्रमोद सावंत

बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी तरतुदी असलेला कायदा तयार करण्याची गरज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज व्यक्त केली.

दैनिक गोमन्तक

गोवा: बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी तरतुदी असलेला कायदा तयार करण्याची गरज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज व्यक्त केली. अशी प्रकरणे हाताळण्यासाठी सध्याचे कायदे ‘कमकुवत’ आहेत, याकडे लक्ष वेधून सावंत म्हणाले, “कायद्यात बदल करावे लागले तर ते आणले जातील.”

(Cm Pramod Sawant's stand against illegal conversions)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी असेही सांगितले की त्यांची कायदेशीर टीम राज्य, इतर राज्ये तसेच राष्ट्रीय कायद्यातील अवैध धर्मांतराशी संबंधित तरतुदींचा अभ्यास करत आहे. पैसे देऊन किंवा संमोहन करून बेकायदेशीर धर्मांतर केले जात असल्याचा आरोप करून सावंत यांनी असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले.

बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांवर राज्याने कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई होऊ शकली नसल्याची खंत व्यक्त करून सावंत म्हणाले, प्रचलित कायद्यानुसार अशी बेकायदेशीर धर्मांतरे रोखता येत नसतील, तर तसा कायदा यावाच लागेल. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT