CM Pramod Sawant | Illegal Stone Carving | Government of Goa Dainik Gomantak
गोवा

अवैध चिरेखाण मालकांवर कारवाई करणार

सूचना फलक लावणार असल्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील अवैध रिकाम्या ठेवलेल्या चिरे खाणींच्या मालकांवर कारवाई केली जाणार आहे. या रिकामी खाणींमध्ये पावसाचे पाणी साठल्यानंतर येथे युवक पोहायला जाऊन बुडण्याच्या घटना घडत असल्याने सरकारकडून दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिला. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

‘सरकारने रिकाम्या खाणी अधोरेखित केल्या असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अवैध खाण मालकांना नोटीस बजवली जाईल. तर, कायदेशीर असलेल्यांना तेथे कुंपण घालण्यासह आवश्यक सुरक्षा खबरदारीचे उपाय करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रिकामी खाणी बुजवण्याची सूचना खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याने केली आहे’, असे डॉ.सावंत यांनी स्पष्ट केले.

सरकारने तुये गावातील अवैध रिकामी चिरे खाणी शोधून काढल्या आहेत. जैव विघटनशील आणि गैर-धोकादायक कचऱ्याचा वापर करून रिकामी खाणी बुजवण्यात येईल. तसेच सूचनाफलक लावले जातील. अशा ठिकाणी पोहणे यासारख्या क्रियाकलाप करू नये. पोलिसांना गस्त करून पाळत ठेवण्याचा आदेश दिला आहे, असंही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT