CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: ''...उड्डाणपूल नको म्हणून रद्द करुन घेणारेच अपघातांना जबाबदार''; मुख्‍यमंत्री स्पष्टच बोलले

Goa Assembly: दोन‌ खांब-धारगळ येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल नको म्‍हणून तो रद्द करुन घेणारेच आज तिथे होणाऱ्या अपघातांना जबाबदार आहेत.

Manish Jadhav

दोन‌ खांब-धारगळ येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल नको म्‍हणून तो रद्द करुन घेणारेच आज तिथे होणाऱ्या अपघातांना जबाबदार आहेत, असे रोखठोक प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले. त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केली होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी दीर्घकालीन असा विचार करावा. लोक आज काय मागणी करतात म्हणून त्यांना साथ दिली तर उद्या तीच मागणी परत घेण्याची वेळ येते. सरकार दीर्घकालीन विचार करते आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेते, असे त्‍यांनी ठासून सांगितले.

केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आता उड्डाणपुलासाठी 46 कोटी रुपये अतिरिक्त मंजूर केले आहेत. पुलाचा आराखडा तयार केला असून सल्लागारही नेमला आहे. आता स्थानिकांना थोडी कळ सोसावी लागेल. उड्डाणपूल नको म्हणून आंदोलन केलेल्यांना आता अपघातांची जबाबदारी स्वीकारावी लागेल. तूर्त तिथे वेग मर्यादा आणून, गतिरोधक, वाहतूक पोलिस नेमून अपघात टाळण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आमदार जीत आरोलकर म्हणाले की, दोन खांब-धारगळ येथे उड्डाणपूल हवा. तिथे 26 अपघात झाले असून त्‍यातील तीन जीवघेणे ठरले आहेत. सर्व्हिस रोडवर गाड्या उभ्या केल्या जातात. यामुळे महामार्ग ओलांडण्यासाठी सर्व्हिस रोडचा करता येत नाही.

उड्डाणपुलाचे काम बंद पाडले कोणी?

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी कोणाच्या मागणीवरून उड्डाणपुलाचे काम बंद पाडले, त्‍यामुळे अपघातांना कोण जबाबदार ठरले आहेत, त्‍यांची नावे सभागृहाला सांगावीत अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उद्या याबाबतचा पत्रव्यवहार सभागृह पटलावर ठेवतो असे नमूद केले.

पत्रादेवी ते करासवाडा रस्ता आता पूर्ण झाला आहे. या रस्त्याच्या मूळ आराखड्यात दोन खांब-धारगळ येथे उड्डाणपूल होता. दुकानांना व्यवसाय होणार नाही म्हणून तो उड्डाणपूल रद्द करायला लावला. आता अपघात होऊ लागल्यावर पुन्हा उड्डाणपूल हवा अशी मागणी होऊ लागली आहे. सरकार या पद्धतीने कारभार करु शकत नाही.- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT