CM Pramod Sawant Visits HM Amit Shah Dainik Gomantak
गोवा

UK Visa issue: ब्रिटिश ई-व्‍हिसा मुद्दा गृहमंत्री अमित शहांच्या दरबारात

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली भेटीदरम्यान गृहमंत्री अमित शहांना कथन केली समस्या

गोमन्तक डिजिटल टीम

भारत सरकारने ब्रिटिश पर्यटकांसाठी पूर्वीची ई-व्हिसा (UK E-Visa issue) सुविधा बंद केल्याने देशात ब्रिटिश पर्यटक येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा थेट परिणाम गोव्याच्या पर्यटन (Goa Tourism) आणि आदरतिथ्य (Hospitality) उद्योगांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बुधवारी (दि.12) दिल्ली दौऱ्यावर असताना ई-व्हिसा मुद्याची चर्चा गृहमंत्री अमित शहा यांच्याशी केली.

ई-व्हिसा सुविधेबाबत गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांना माहिती दिली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी यासाठी येणाऱ्या समस्या लवकरच सोडवल्या जातील असे आश्वासन दिले आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी गुरुवारी पणजीत पत्रकारांशी बोलताना दिली. ब्रिटिशांनी गोव्याकडे पाठ फिरविली तर 400 ते 500 कोटींचा फटका गोवा राज्याला बसणार आहे.

कोरोना संकटाच्या पूर्वीच्या आकडेवारीनुसार गोव्यात प्रतिवर्ष 40 ते 50 हजार ब्रिटिश पर्यटक येत असून ते दरडोई सरासरी 98 हजार रुपये खर्च करतात. ही एकूण उलाढाल 400 ते 500 कोटींच्या घरात जात असल्याची माहिती आहे. यूकेतून भारतात येणाऱ्या पर्यटकांना ई-व्हिसा पद्धत बंद करून आता व्हिसा केंद्रात जाऊन प्रत्यक्ष व्हिसा घेण्याची सक्ती केली आहे. यामुळे भारतात येणाऱ्या ब्रिटिश पर्यटकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्याचा विपरित परिणाम राज्यातील हॉटेल्स व इतर पर्यटन उद्योगावर झाला आहे.

तसेच, रशियन चार्टर विमानही रद्द झाले आहे. एकूणच राज्यासाठी हा दुहेरी धक्‍का मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT