CM Pramod Sawant on Crime done by outsiders  Dainik Gomantak
गोवा

CM On Migrant Workers: गोव्यातील गुन्ह्यात परप्रांतीयांचाच हात; मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

Kavya Powar

CM on Migrant Workers Committing Crime in Goa : राज्यातील वाढते गुन्हेगारीचे प्रमाण पाहता गोवेकर आणि सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यातील गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने परप्रांतीयांचा सहभाग असतो, असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साधारण महिन्याभरापूर्वी केले होते.

याचसंदर्भात त्यांनी पुन्हा एकदा या विषयाला हात घालत परप्रांतीयांवर निशाणा साधला आहे.

यावेळी ते म्हणाले की, गोव्यातील नागरिक हे प्रामुख्याने कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीच्या वादात अडकून असतात. जास्तीतजास्त एखाद-दूसरा गोवेकर अत्याचारासारख्या गुन्ह्यांत सहभागी असू शकतो, पण त्यापलीकडे खुनासारख्या गंभीर घटनेत त्यांचा सहभाग नसतो.

आपल्याकडे बाहेरून येणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जर आपण पाहिलं तर परप्रांतीय त्यांच्या राज्यात गुन्हे करतात आणि त्यापासून लपण्यासाठी गोव्यात येऊन भाड्याच्या खोलीत राहतात आणि इथे येऊनही तेच प्रकार करतात. त्यामुळे आता हा चिंतेचा विषय बनला आहे.

सरकारसोबतच नागरिकांनीही सजग असणे गरजेचे.... : मुख्यमंत्री

वाढत्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करताना मुख्यमंत्र्यांनी जनतेनेही सरकारला सहकार्य करून स्वत: जागरूक राहण्याचे आवाहन केले. यासाठी बाहेरील राज्यातून गोव्यात भाड्याने राहणाऱ्या लोकांचे वेरीफीकेशन होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे या गुन्ह्यांवर आपण आळा घालू शकू.

त्याबरोबरच परप्रांतीय मंजुरांचे कामगार कार्ड आहे की नाही ते तपासणेही आवश्यक आहे.

नागरिकांना घडणाऱ्या गुन्ह्यांची जाणीव असणे महत्वाचे..

गोवेकरांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेची, गुन्ह्यांची माहिती आणि जाणीव असणे महत्वाचे आहे. कारण घटनेचे गांभीर्यच जर तुम्हाला माहित नसेल तर अशा गुन्ह्यांना कधीतरी तुम्हीही बळी ठरू शकता.

हे जर होऊ द्यायचे नसेल तर आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊन पोलिसांना त्याबद्दल माहिती द्या. यासाठी सर्वात आधी आपल्या पोलीस बांधवांवर विश्वास ठेवा. ते तुमच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर आहेत. पोलिसांतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या.

गुन्हेगारीबद्दल सामान्य नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलिसांतर्फे राज्यातील शाळांमध्ये जागरूकता कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते.

शेवटी, गोवा पोलिसांचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा पोलिसांचे गुन्हे शोधण्याचे प्रमाण देशभरात सर्वात जास्त म्हणजे 94 टक्के इतके आहे. त्यामुळे राज्याचा वाढत्या गुन्हेगारीचा दर कमी करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकारी करणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT