Pramod Sawant and Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा

Goa: मुख्यमंत्री सावंत यांनी नजर भिडवून बोलावे: लक्ष्मीकांत पार्सेकर

पार्सेकर म्हणाले, मांद्रे मतदारसंघातून निवडून आलो तरी परत आणखी भाजपमध्ये परत जाणे नाही.

दैनिक गोमन्तक

पेडणे: माझ्याकडे कुणीही पक्ष सोडू नये म्हणून मतपरिवर्तन करण्यासाठी आलेले नाहीत. मुख्यमंत्री सावंत यांनी आमनेसामने येवून मान उंचावून डोळ्यात डोळे घालून तसे सांगावे असे आव्हान माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी मुख्यमंत्र्याना दिले. अपक्ष उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Goa Election News Updates)

पार्सेकर म्हणाले, मांद्रे मतदारसंघातून निवडून आलो तरी परत आणखी भाजपमध्ये (BJP) परत जाणे नाही. मला निवडून येऊन माझ्या मंत्री व मुख्यमंत्रिपदाच्या काळात सुरू होऊन नंतरच्या पाच वर्षांत पूर्ण होवू न शकलेले अनेक प्रकल्प मला पूर्ण करुन घ्यावयाचे आहेत. मला जनतेने उमेदवारी दिलेली आहे. भाजपने माझी फसवणूक करून उमेदवारी नाकारली असा आरोप त्यांनी केला. पाच वर्षांसाठी जो आमदार दिला होता त्या आमदाराने हे प्रकल्प पुढे नेले नाही. तो पाच वर्षे काय करत होता आणि आणि कुठल्या तोंडाने पाच वर्षे पुढील आमदाराची संधी द्या म्हणतो व त्याला ती देण्यात येते असे पार्सेकर म्हणाले .

सरकारी नोकऱ्या (Government Jobs) देतो म्हणून काही जण बंडबाजी करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात आपण सर्व तरुण तरुणांना सामावून घेण्यासाठी आयटी प्रकल्प आणला, रस्ता केला, मात्र आयटीला जोडणारा राष्ट्रीय महामार्गाला जोडला नाही. पाच वर्षात सरकारने काहीच केले नाही असा आरोप पार्सेकर यांनी केला.

कोण म्हणतात आमची बोलणी चालू आहे? आता त्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. तुम्ही आम्हाला तुडवले, चिरडले, आणि आता बोलणी? पूर्ण विश्वास ठेवून पक्षाकडे निष्ठा ठेवून वागलो काम केले, पक्ष मोठा केला. त्यालाच ही अवेहलना सहन करावी लागली. ती जर वैयक्तिक असती तर सहन केली असती. मात्र, पेडणे तालुक्याच्या जनतेच्या प्रतिष्ठेचा हा विषय आहे.

- लक्ष्मीकांत पार्सेकर, अपक्ष उमेदवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT