School Bazaar Day Dainik Gomantak
गोवा

‘School Bazaar Day’ उपक्रमातून व्यावहारिक ज्ञानाप्राप्ती : मुख्यमंत्री डॉ. सावंत

कोठंबी-पाळी टागोर संस्थेच्या विद्यालयात फळे, भाजीची विक्री

दैनिक गोमन्तक डिजिटल

शाळेत बाजार दिवस साजरा करून मुलांना सामानाच्या विक्रीचा अनुभव दिल्याने मुलांना विद्यार्थी दशेत व्यावहारिक ज्ञानप्राप्त होते. मार्केटिंग कसे करावे? याचे धडे मुलांना मिळतात. त्याचप्रमाणे व्यवहारातून उपलब्ध झालेले पैसे कसे खर्च करायचे, या विषयावरही मुलांना मार्गदर्शन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोठंबी-पाळीत आयोजित ‘बाजार डे’ कार्यक्रमात केले.

कोठंबी येथील टागोर शैक्षणिक संस्थेतर्फे विद्यालय सभागृहात शनिवारी ‘बाजार डे’चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, मुख्याध्यापक जनार्दन सावंत, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रीपाद घाडी, डॉ. अशोक प्रियोळकर, प्रकाश परब यांची उपस्थिती होती.

पालकांनीही आधुनिक यंत्रणेचा उपयोग मुलांच्या शिक्षणात करून घेतल्यास आपल्या मुलांना त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ‘बाजार डे’त बसलेल्या सर्व मुलांशी संवाद साधला.

काही सामानही खरेदी केले. मुख्यमंत्र्यांनी एका विद्यार्थ्यांला कलिंगडचा दर विचारला, तेव्हा विद्यार्थीनेही उत्साहाने दर सांगितला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कलिंगड खरेदी केले.

खाद्य पदार्थांना अधिक मागणी

टागोर विद्यालय परिसरात राहणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थी वर्गाने या ‘बाजार डे’ला घरी बनवलेले विविध खाद्यपदार्थ उपलब्ध होते. त्यांना चांगली मागणी होती. भाजीपाला, फळे विक्री करण्यात आला.

आजच्या व्यवहारातून शाळेतील चिमुकल्या मुलांनाही बाजार दिवसाचे महत्त्व समजले. विद्यार्थ्यांनी यावेळी केळी, काकडी, विविध प्रकारची भाजी, फणस, लोणचे, लाडू, चिकू, गरे, तोर, वांगी, पपई, फुले, नारळ, वाल इत्यादी वस्तू विक्रीस ठेवल्या होत्या. मुख्याध्यापक जनार्दन सावंत मुलांना बाजाराबाबत माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, हिंसाचार प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT