CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'साखळीत येत्या 5 वर्षांत 25 हजार लिटर दूध उत्पादनाचे ध्येय'

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant: संपूर्ण गोव्याला दरदिवशी साडेचार लाख लिटर दुधाची आवश्यकता असून गोव्यात केवळ ६० हजार लिटर इतकेच दूध उत्पादित होते. येणाऱ्या काळात डेअरी फार्ममध्ये दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी कुडतेतील ‘गोमांचल डेअरी’ने संकल्प सोडला आहे. येत्या पाच वर्षांत साखळी मतदारसंघात २५ हजार लिटर दूध उत्पादनाचे ध्येय आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत दिली.

कुडणे येथील गोमांचल डेअरी व इतर शेतकरी व दूध उत्पादकांची एक बैठक साखळीतील रवींद्र भवनात झाली. या बैठकीस मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह सुभाष मळीक, सल्लागार म्हणून नियुक्त बालाजी रेड्डी व इतरांची उपस्थिती होती. गोमांचल डेअरीशी संलग्न असलेल्या दूध उत्पादकांना या उत्पादनात मार्गदर्शन व सर्व प्रकारचे सहकार्य, मदत मिळावी यासाठी बंगळुरू येथील बालाजी रेड्डी यांची या डेअरीचे सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सल्लागाराचा लाभ गोमांचल डेअरीशी संलग्न दूध (Milk) उत्पादकांबरोबरच इतरही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणार !

दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) उत्पादन वाढवून आर्थिकदृष्ट्या मजबूत बनविण्यासाठी तसेच या क्षेत्रातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन गायी खरेदी, गायींना वैद्यकीय उपचार, पशुखाद्य यांचा पुरवठा केली जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या या क्षेत्रात प्रगतीसाठी या सल्लागारांकडे पथक असून त्या पथकाद्वारे सर्व मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल, याचा लाभ साखळीतील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोडगावयलो

उत्क्रांतीचे झाड

Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराजांचे पुण्यस्मरण

Hit & Run Case : घाेगळ येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पत्रकार जखमी

Garbage Project : वेर्णा येथील कचरा प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT