CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

संसाधनाअभावी पालिकांचे ऑडिट रखडले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

फातोर्डा येथील श्री साई बाबा मंदिराच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना सोहळ्यास मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: संसाधनांच्या अभावामुळे गोव्यातील नगरपालिकांच्या हिशोब तपासणीचे काम झालेले नाही. नगरपालिका प्रशासन संचालनालयाने याबद्दल सरकारशी संपर्क साधला असून हिशोब तपासणीचे काम लेखा संचालनालयाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार लेखा संचालनालयाने कामास सुरवात केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्र्नाला उत्तर देताना सांगितले.

फातोर्डा येथील श्री साई बाबा मंदिराच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना सोहळ्यास मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. आपल्या कार्यालयाने याची दखल घेतली असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल,असेही ते म्हणाले.

दोनच दिवसांपूर्वी मडगावचे नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी नगरपालिकेचे ऑ़डिट झाले नसल्याचे पत्रकारांना सांगितले होते व मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी , अशी विनंतीही केली होती.

दरम्यान, श्री साईचे दर्शन घेतल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्याची संस्कृती व परंपरा जपण्याचे काम मंदिरांनी केले आहे. मंदिरे ऐक्याचे, सद्‍भावनेचे प्रतीक आहेत. लोक आपसातील मतभेद विसरून मंदिरात येतात. गोव्याची परंपरा व संस्कृती जपली पाहिजे. प्रत्येकाला गोव्याचा इतिहास समजला पाहिजे. या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, नगरसेवक सदानंद नाईक उपस्थित होते. घोगळ येथील साईबाबा ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार दामू नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT