CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

काणकोण वासीयांना भिवपाची गरज ना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कमलाकर गावकर यांच्या घराची पायाभरणी करपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आणि सभापती रमेश तवडकर उपस्थित

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण वासीयांना विकास, रोजगार व पायाभूत सुविधा या बाबतीत भिवपाची गरज ना असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी शनिवारी (ता.9) बड्डे- खोतीगाव येथे कमलाकर गावकर यांना देणगी निधीतून घर उभारणी करण्यासाठी घराची पायाभरणी केल्यानंतर सांगितले.यावेळी सभापती रमेश तवडकर, नगराध्यक्ष सायमन रिबेलो,मंडळ अध्यक्ष विशाल देसाई उपस्थित होते.

बड्डे-खोतीगावात कमलाकर गावकर यांच्या घराची पायाभरणी करपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आणि सभापती रमेश तवडकर उपस्थित होते.

स्वयंपूर्ण गोंय-2 या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.स्वंयपूर्ण मित्राच्या माध्यमातून ज्याना आसरा नाही अशा गावातील गरजवंता पर्यत जाऊन त्याना घर बांधून देण्यात येणार आहे.घर बांधणीसाठी 2.50 लाख व घर दुरूस्ती साठी 1.50 लाख रूपये अर्थसहाय्य देण्यात येईल.त्याशिवाय काही घरबांधणीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रूपयांची आर्थीक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. काणकोणचे आमदार सभापती आहेत त्यांनी मुख्यमंत्री,सरकारला आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री,सरकार तुमच्या दाराशी येईल.यापूर्वी सरकार तुमच्या दारी या योजनेअंतर्गत प्रत्येक मतदारसंघात भेट देऊन सरकारी योजना नगरिकापर्यत पोचविण्याचा प्रयत्न केला.त्याच्या पुढे जाऊन आता मतदार संघातील तीन चार पंचायतीना भेट देऊन समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याची योजना आहे.

यावेळी सभापती रमेश तवडकर यांनी मतदार संघात कार्यकर्त्यांसमवेत फिरताना काही रहिवाशांना राहण्यासाठी पक्के घर नाही याची जाणीव झाली आणि त्याचवेळी अशा घराविना असलेल्या रहिवाशांना छप्पर लोकसहभागातून देण्याचा संकल्प केला.त्यातूनच देणगी पेटीची संकल्पना पुढे आली.पूर्वीच्याकाळी गावातील लोक घरबांधणी, शेतीकामात एकमेकांना मदत करत असत ही परंपरा काळाच्या ओघात लोप पावली आहे तिला पुर्नजिवित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.भाजप कार्यकर्त्यामार्फत प्रत्येक घराचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.त्या सर्व्हेक्षणातून रहिवाशांच्या सामाजिक,आर्थिक व आरोग्य विषयक अडचणी समजून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे.खोतीगाव व गावडोंगरीतील कनेक्टिव्हिटीची समस्या मोबाईल टॉवर उभारून दूर करण्याची मागणी सभापती तवडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.त्याचप्रमाणे एका महिन्यात कमलाकर गावकर यांचे घराची पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT