Goa Cabinet Reshuffle Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सदानंद तानावडे दिल्लीला रवाना; जेपी नड्डांसोबत मंत्रिमंडळ फेरबदलावर होणार चर्चा?

मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचा मुद्दा बऱ्याच कालावधीपासून सुरू असून यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचा मुद्दा बऱ्याच कालावधीपासून सुरू असून यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि सदानंद तानावडे हे जेपी नड्डांशी राज्यसभेची जागा तसेच मंत्रिमंडळातील फेरबदल करण्याच्या निर्णयावर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर हे बदल होतील, अशीही चर्चा होती. मात्र ती सत्यात उतरताना दिसत नाही.

याबाबत काही दिवसांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते आणि गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी विधान केले होते. ते म्हणाले होते की, मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे किंवा नाही, हे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. तेच याबाबत निर्णय घेतील. पक्ष केवळ पक्षाचे मत कळवू शकतो आणि तशी विचारणा झाल्यास मुख्यमंत्र्यांना पक्षाचे मत कळवू, असेही ते म्हणाले होते.

दिल्लीमधील या भेटीनंतर याबाबत नेमका काय निर्णय होणार यावर अनेकांचे भविष्य अवलंबून असून याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT