CM Pramod Sawant | Rahul Gandhi | PM Modi 
गोवा

CM Sawant RaGa: 'दहा वर्षांत मोदींनी काय केले सांगतो', CM सावंत राहुल गांधींसोबत खुली चर्चा करण्यास तयार

CM Sawant RaGa: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर आरोप करताना, खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे आता वय झाल्याची टिप्पणी केली.

Pramod Yadav

Goa CM Pramod Sawant Ready To Debate With Rahul Gandhi

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष आता एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी राज्यात प्रचंड मतानी निवडून येण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

भाजपने केवळ उत्तरेतील उमेदवार जाहीर केला असून, दक्षिणेतील उमेदवाराची घोषणा बाकी आहे. तर, काँग्रेसच्या दोन्ही जागेवर अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, दोन्हीकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर टीका करत, खासदार राहुल गांधी यांच्याशी खुली चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात काय केले याची माहिती देतो, असेही सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर आरोप करताना, खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे आता वय झाल्याची टिप्पणी केली.

गेल्या पाच वर्षात सार्दिन यांनी फोंड्यात कोणतेच कामे केले नसल्याने त्यांना येथे कोणी ओळत नसल्याचा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.

दक्षिणेत विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या उमेदवारीला गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विरोध केला आहे. फातोर्डात खासदार निधीतून कामे न केल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला होता.

यावर प्रतिक्रिया देताना, माझ्याकडे कामाची मागणी केलेल्या सर्वांची कामे केली आहेत, जे आले नाहीत त्यांची कामे कशी करणार?, असे सार्दिन म्हणाले.

तसेच, दक्षिण गोव्यात कामे केल्यानेच पुन्हा उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा निर्णय असून, घटकपक्ष काय म्हणतात यावर मतप्रदर्शन करणार नाही, असेही सार्दिन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT