CM Pramod Sawant Gomantak Digital Team
गोवा

CM Pramod Sawant : राज्यात रात्री उशिरापर्यंत बससेवा

मुख्यमंत्री : कदंबच्या ताफ्यात 20 इलेक्ट्रिक बसेस; जुलैअखेर आणखी 100 बसेस

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या आपल्या राज्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकारतर्फे अनेक प्रयत्न सुरू आहेत. जुलैअखेर कदंबच्या ताफ्यात आणखी 100 अत्याधुनिक बसेस दाखल होतील, असे सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नव्या 20 वातानुकूलन इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखविला. राज्यातील सर्व शहरांना जोडणारी आणि रात्री उशिरापर्यंत चालणारी बससेवा लवकरच सुरू होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बांबोळी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री माविन गुदिन्हो, केटीसीएल अध्यक्ष उल्हास तुयेकर, पणजी महापौर रोहित मोन्सेरात, आमदार रुडाल्फ फर्नांडिस, महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कदंब महामंडळाच्या बसेसमधील सर्व सुविधा या खासगी बसेसमध्येही असतील. याबरोबरच पणजी, मडगाव, फोंडा, म्हापसा आणि वास्को स्थानकांवर या इलेक्ट्रिक बसेस चार्ज करण्यासाठीचे चार्जिंग स्टेशन्स उभे करण्यात येतील आणि बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दिव्यांगांसाठी सुविधा

कदंब महामंडळाच्या ताफ्यात 20 नव्या एसी इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. या इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांना चढ-उतार करण्यासाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. तसेच या बसेस पोलिस ठाण्याशी कनेक्ट व रियल टाईम टेबल अशा सुविधांनी सज्ज आहे. त्याचा फायदा दिव्यांगांना नक्कीच होईल.

अशी आहेत वैशिष्ट्ये

  • दिव्यांग लोकांसाठी चढणे उतरणे सुलभ होणार.

  • बसमधील अत्याधुनिक कॅमेरे  पोलिस  स्टेशनशी जोडले गेलेले आहेत.

  • बसची रियल टाईम माहिती मोबाईलवर मिळेल, त्यासाठी मोबाईल ॲप येणार.

  • तिकिटासाठी क्यूआर कोड सुरू केला आहे.

पर्यावरणासाठी फायदेशीर

आम्ही यापूर्वी शंभर टक्के  इलेक्ट्रिक  बसेस बाजारात आणल्या. त्यांनी आतापर्यंत ७४ लाख कि.मी. अंतर कापले आहे. यामुळे 36 टक्के कार्बन उत्सर्जन कमी झाले. जेव्हा आणखी १०० इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावायला लागतील त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि ग्रीन ऊर्जेचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

राज्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून सर्व प्रमुख शहरांना जोडणाऱ्या आणि रात्री उशिरापर्यंत चालणारी वाहतूक व्यवस्था सुरू केली जात आहे. यासाठीच खासगी बसेस महामंडळाबरोबर जोडल्या जाणार आहेत. यासाठी काहीसा उशीर झाला असला, तरी ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

SCROLL FOR NEXT