CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

गोंयचो सायब वादावर मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका

गोंयचो सायब प्रश्नाला मुख्यमंत्र्यांकडून बगल; एकता आणि शांतता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सध्या गोंयचो सायब कोण यावरुन रणकंदन माजलं आहे. सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्सबाबत प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे गोव्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वादापासून दूर राहणंच पसंत केल्याचं दिसत आहे. गोवा सरकार राज्यात शांतता आणि एकता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील असून तेच राज्यासाठी गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे.

आमच्याकडून कोणतंही पूर्वग्रहदूषित आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेलं नाही. गोवाचं सांस्कृतिक वैभव पुढे नेण्यासाठी आणि एकता अबाधित राखण्यासाठी गोव्यात कायदा अस्तित्वात आहे. गोवा राज्य हे एकतेसाठी ओळखलं जातं. तसंच राज्याची वाटचाल प्रगतीपथावर होताना दिसत आहे. याच धर्तीवर गोवा सरकार सातत्याने जनतेसाठीच काम करत राहणार असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.

सुभाष वेलिंगकर यांनी परशुरामच गोव्याचे रक्षणकर्ते आहेत. त्यामुळे फ्रान्सिस झेवियरला ‘गोंयचो सायब’ म्हणणे चुकीचे असल्याचं वक्तव्य केलं होतं. गोव्यामध्ये होली इंक्विजिशन ही क्रूर यंत्रणा आणण्यास फ्रान्सिस झेवियर हाच पूर्णपणे जबाबदार होता, असं म्हणत गोव्यात होली इंक्विजिशनने अडीचशेहून अधिक वर्षे केलेल्या जुलमी अत्याचारांची माहिती आताच्या गोव्यातील नव्या पिढीला देणं गरजेचं आहे. यासाठीच 3 मे रोजी ‘गोवा फाईल्स’ गोमंतकीयांसमोर ठेवणार असल्याचं वक्तव्य हिंदू रक्षा महाआघाडी गोवाचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केलं होतं. आता वेलिंगकरांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत.

दरम्यान याच वादात उडी घेत रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार वीरेश बोरकर यांनी भाजपही वेलिंगकर यांच्यासोबत वाद निर्माण करण्यात सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला होता. राज्यातील समस्यांकडे जनतेचं दुर्लक्ष व्हावं यासाठीच भाजपकडून हा डाव खेळला जात असल्याचा आरोप बोरकर यांनी केला होता. आपल्या याआधीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सुभाष वेलिंगकर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने चार हात दूरच ठेवलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT