CM Pramod Sawant inaugurated MPCS at Mormugao Taluka  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : आधारभूत संरचना तयार करणार : मुख्यमंत्री

आपत्ती प्रतिरोधक चक्रीवादळ निवाऱ्यांचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक डिजिटल

CM Pramod Sawant: पुढच्या पंचवीस वर्षांचा विचार करून डबल इंजिन सरकार आधारभूत संरचना तयार करण्याच्या कामात गुंतलेले आहे. पुढे अघटित गोष्टी घडण्याच्या अगोदर या सगळ्या सुविधा तयार ठेवण्याची काळजी राज्य सरकार घेत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

जागतिक बँकेकडून आपत्ती व्यवस्थापन निधीतून पूर्ण केलेले नैसर्गिक आपत्तींची तत्काळ पूर्व माहिती देणारे 38 टॉवर्स आणि 11 बहुउद्देशीय आपत्ती प्रतिरोधक चक्रीवादळ निवाऱ्यांपैकी कुएली कासावली व झुआरीनगर येथील टॉवर व बहुउद्देशीय आपत्ती प्रतिरोधक चक्रीवादळ या दोन निवाऱ्यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुरुवारी उद्‍घाटनन करण्यात आले.

यावेळी जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, कुठ्ठाळीचे आमदार तथा खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष आंतोनियो वाझ, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, सांकवाळच्या सरपंच रोहिणी तोरस्कर, पंच जसिया कादर, तसेच कुएलीचे पंचसदस्य, कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा, केळशी सरपंच एफ. एस. फिग्रेलो व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले का जागतिक बँकेच्या निधीतून आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील प्रकल्पांचे काम जलस्त्रोत खात्यामार्फत करण्यात आलेले आहे. अतिसंवेदनशील क्षेत्रांसाठी पूर्वमाहिती देणारी यंत्रणा, चक्रीवादळ निवारे आणि चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी विद्युत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा अशा प्रकारची कामे करण्यात आली आहेत.

दरम्यान परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मागच्या सरकारने संपूर्ण राज्यात कचरा करून ठेवला आहे. तो कचरा भाजपा सरकार काढत आहे. त्यासाठी सरकारला या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी प्रतिवर्षी 500 कोटी रुपये खर्च करावा लागत आहे.

आपण आता प्लास्टिक वापरणार नाही ही सवय लावा. सरकार किती म्हणून कचरा काढणार. कचऱ्यात राहण्याची सवय सोडा, असा सल्ला त्यांनी नागरीकांना दिला.

योग्य निगा राखा

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, नैसर्गिक आपत्तीची पूर्व माहिती देणारे 38 टॉवर आणि 11 चक्रीवादळ निवारे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात येतील.

या प्रकल्पांचा नैसर्गिक आपत्तीवेळी राज्यातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. याचा लोकांनी दुरुपयोग करून घेता काम नये. त्याची योग्य निगा राखणे तुमच्या हातात आहे.

"रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाबाबत कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ पाठपुरावा करून त्यावर योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याविषयी त्यांनी माझ्याकडेही विचार मांडले. रेल्वे अधिकारी, पंचायत मंडळ व स्थानिकांना विश्‍वासात घेऊन याविषयी योग्य तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT