CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

‘मंदिर वही बनायेंगे’; मुख्यमंत्र्यांचा नारा

राज्य अर्थसंकल्पात वीस कोटींची विशेष तरतूद केल्याचीही मुख्यमंत्र्यांची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : पोर्तुगीजांनी चारशे वर्ष राज्यकारभार करत गोव्यातील हिंदू संस्कृती नष्ट करण्यासाठी अनेक भव्य मंदिरे पाडली. ती नव्याने बांधणे गैर काय? असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘मंदिर वही बनायेंगे’ चा नवा नारा रविवारी दिला. राज्य अर्थसंकल्पात वीस कोटींची विशेष तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्ली येथे आयोजित माध्यमांच्या महासंमेलनात त्यांनी गोव्याप्रमाणे देशातील इतर राज्यांनी समान नागरी कायदा लागू करावा असे मत व्यक्त केले.

दिल्ली येथे माध्यमांचे महासंमेलन सुरू आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात करत असलेल्या विविध समाज कल्याणाच्या योजनांची माहिती दिली. शिवाय पोर्तुगीजांनी त्यांच्या राजवटीत हिंदूंचे धर्मांतर करत हिंदूंची भव्य मंदिर पाडली. हे मंदिरे पुनः प्रस्थापित करत हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्यात गैर काय आहे? असे सांगितले.

आपण अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची विशेष तरतूद केली असून त्याआधारे राज्यात पोर्तुगीजांनी पाडलेली मंदिरे पुन्हा पुन्हा उभी करणार असल्याचे स्पष्ट केले. गोवा मुक्तीपासून राज्यात समान नागरी कायदा अंमलात आणला आहे. हा कायदा सर्वांच्या कल्याणासाठी योग्य आहे. देशातल्या अन्य राज्यांनीही समान नागरी कायदा लागू करावा अशी मागणी त्यांनी या संमेलनात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राहुल गांधींची 'जादूगार' टीपण्णी अन् भाजपचा पलटवार, लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले; राजनाथ सिंहांची माफीची मागणी

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

SCROLL FOR NEXT