CM Dr. Pramod Sawant on Anjuna News Dainik Gomantak
गोवा

Anjuna News: हणजूणमधील 175 आस्थापनांचा मुद्दा; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

हणजूणमधे 175 आस्थापने सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

CM Dr. Pramod Sawant on Anjuna News

हणजूणमधे 175 आस्थापने सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पंचायतीच्या या प्रक्रियेविरूद्ध काल सोमवार (ता. 19) हणजूण ग्रामस्थांनी 'हणजूण गाव बंद' पाळला होता. यासंदर्भात आमदार मायकल लोबोंनी काल ग्रामस्थांना भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच आपण मुख्यमंत्र्यांशी यावर बोलणार असल्याचे आश्वासन दिले.

आज मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, स्थानिक पंचायत सचिवांनी चुकीची नोटीस जारी केली आहे. ज्यांच्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि जे कायदेशीर व्यवसाय चालवितात त्यांना काहीच धोका नाही. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार त्यांच्यासोबत आहे.

तसेच उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. पंचायत सचिवांनी चूक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, सरकारने या कायदेशीर कचाट्यातून ग्रामस्थांच्या सुटकेसाठी नियमांत विशेष दुरुस्ती करावी. सध्या ग्रामस्थ एकवटले असून सरकारने संयमाचा अंत पाहू नये. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी यावर तोडागा काढावा, अन्यथा किनारी भागांत भाजप विरोधात प्रचार करू, असा सज्जड इशारा संतप्त आंदोलकांनी सरकारला दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT