CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Startups Goa : गोवा बनवणार क्रिएटिव्ह हब; 12 स्टार्टअप्सना मिळणार तब्बल 3.28 कोटी

राज्यात 164 स्टार्टअपची आयटी विभागाकडे नोंदणी झाली आहे. या विभागाकडून 15 आयटी कंपन्यांना प्रमाणित केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Startups Goa : गोव्याला देशाची पर्यटन राजधानी आणि क्रिएटिव्ह हब बनवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून यासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. यासाठीच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या स्टार्टअप्सना आर्थिक प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राज्याच्या धोरणानुसार स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 3 कोटी 28 लाख रुपये मंजूर केले असून 9 स्टार्टअप्स आणि 3 आयटी कंपन्या मिळून 12 आस्थापनांना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यात 164 स्टार्टअपची आयटी विभागाकडे नोंदणी झाली आहे. या विभागाकडून 15 आयटी कंपन्यांना प्रमाणित केले आहे. 164 स्टार्टअप्सपैकी 51 स्टार्टअप्स लाभार्थी आहेत. तसेच 15 आयटी कंपन्यांनाही सरकारकडून मदत केली जाते, असंही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

खंवटे म्हणाले, राज्याला क्रिएटिव्ह हब आणि पर्यटन राजधानी बनवण्यासाठी आयटी क्षेत्राचा मोठा हातभार लागत आहे. यासाठी आयटीपूरक इको सिस्टम बनवण्याचे काम सुरू असून येत्या काही दिवसांत आयटी क्षेत्रात तरुणांना 100 टक्के रोजगार मिळेल. शिवाय राज्यात गुणवत्ताप्राप्त रोजगार संधी उपलब्ध झाल्याने तरुणांना रोजगार मिळेल.

स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी 10 कोटींची तरतूद केली आहे. यापैकी 12 कंपन्यांना 3 कोटी 28 लाख मंजूर केले असून 2 कोटी 45 लाख रुपये आधीच वितरित केले आहेत. तसेच, आयटीसाठी मंजूर 85 लाखांपैकी 39.34 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून वितरित केले आहेत, अशी माहिती मंत्री खंवटे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT