CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : कोकणीच नाही; तर 'या' भाषेलाही गोव्यात मिळणार मानाचं स्थान; मुख्यमंत्री सावंतांचं मोठं वक्तव्य

नवीन शैक्षणिक धोरणात राष्ट्रीय आणि मातृभाषेवर भर देण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

नवीन शैक्षणिक धोरणात राष्ट्रीय आणि मातृभाषेवर भर देण्यात आला आहे. संस्कृत भाषा शिकण्यासाठी शाळेतील किमान 15 विद्यार्थी तयार झाले, तर त्यांच्यासाठी सरकार स्वतंत्र संस्कृत शिक्षकाची नेमणूक करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. डिचोली येथील केशव सेवा साधना शाळेत आयोजिलेल्या सात दिवसीय निवासी संस्कृत प्रबोधन वर्गाचे रविवारी उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

राजभाषा संचालनालयाच्या सहकार्याने संस्कृत भारतीतर्फे या प्रबोधन वर्गाचे आयोजन केले आहे. यावेळी व्यासपीठावर उद्योजक तथा केशव सेवा साधना शाळेचे अध्यक्ष सागर शेट्ये, विठ्ठल भट, मनोहर काजरेकर, प्रसाद उमर्ये आदी उपस्थित होते.

सर्व ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. आयुर्वेदिक शिक्षणातही संस्कृत भाषा आवश्यक आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी भवितव्याचा विचार करुन संस्कृत भाषेमध्ये रुची दाखवावी, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले. सात दिवस चालणाऱ्या या निवासी संस्कृत प्रबोधन वर्गात कोकण प्रांतातून एकूण 90 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

संस्कृत ही करिअर ठरविणारी भाषा

यावेळी डॉ. सावंत म्हणाले की, प्राथमिक स्तरापासून संस्कृत भाषेचे धडे विद्यार्थ्यांना मिळावेत, यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. संस्कृत ही करिअर ठरविणारी भाषा आहे, याचे भान ठेवून विद्यार्थ्यांनी ती आत्मसात करावी. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. सुसंस्कारित, आदर्श नागरिक घडवण्याचे सामर्थ्य केवळ संस्कृत भाषेतच आहे. अशी ही संस्कृत भाषा संपूर्ण विश्वाची भाषा ठरावी, यासाठी भारत प्रयत्नशील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT