Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : ..तर अधिक शिक्षक देऊन शाळा चालवू!

आपच्या मागणीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा पलटवार; विद्यार्थी हितालाच प्राधान्य देत असल्याचा दावा

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant : शासकीय प्राथमिक शाळांच्या विलिनीकरणाच्या निर्णयावर नागरिकांचा विरोध आहे. विरोधी पक्षांनीही यावरून टीकेची झोड उठविली आहे. यावर ‘ज्या सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थीसंख्या कमी आहे, तेथील पालक तयार असतील तर तेथे अधिक शिक्षक देऊन त्या शाळा चालवण्यास सरकार तयार आहे’, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्पष्ट केले.

‘प्राथमिक शाळा बंद करू असे आतापर्यंत आपण कधीच म्हटलो नाही. दोन-तीन विद्यार्थी असलेल्या शाळांचे जवळच्या शाळांत विलिनीकरण करून तेथील शिक्षकांची संख्या वाढवणे, नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्था पुरवणे आणि एकंदरीत सरकारी प्राथमिक शाळांच्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने सरकारने शाळा विलिनीकरणासंदर्भात सर्वेक्षण करून शिक्षक, पालकांशी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे’, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

सरकारला शाळांच्या इमारतींची नव्हे, तर विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षणाची चिंता आहे. त्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचा पाया बळकट करण्याचे सरकारचे ध्येय आहे. त्यासाठीच चाचपणी सुरू आहे. परंतु, काही राजकीय पक्षांनी यावरून प्रसिद्धी मिळवण्याचा खटाटोप सुरू केला आहे, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT