Cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणारच

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही; 10 ऑगस्टला मतदान

दैनिक गोमन्तक

पणजी : पंचायत निवडणुकांबरोबर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांमधील सर्व 19 उपजातींना आरक्षण देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून येत्या पंचायतींच्या निवडणुकांमध्येही ओबीसींना आरक्षण दिले जाईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कामाचा आढावा घेणारे ई-बुक पणजी येथील पक्ष कार्यालयात प्रकाशित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, रुपेश कामत उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आदेशानुसार आमचे सरकार राज्यातील ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्यासाठी प्रयत्न होतेच, त्यात त्रिसुत्री पद्धतीने हे आरक्षण लागू करण्याची अट न्यायालयाने घातल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अशातच पावसाळा एक कारण होते. आता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 10 ऑगस्टला पंचायत निवडणुका घेण्यात येतील. यासाठी येत्या चार पाच दिवसांत ओबीसीची संकलीत माहिती राज्य निवडणूक आयोगाल देण्यात येईल आणि त्यानुसार या निवडणुका होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT