CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: डिचोली बगलमार्गावर वाहतूक पोलिस तैनात करणार; मुख्यमंत्री सावंत यांचे आश्‍‍वासन

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विधानसभेत शून्य तासाला हा विषय उपस्थित केला होता

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली बगलमार्गावर वाढते अपघात लक्षात घेता तेथे वाहतूक पोलिस तैनात केले जातील, असे आश्‍‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विधानसभेत शून्य तासाला हा विषय उपस्थित केला होता.

शेट्ये म्हणाले, व्हाळशी ते वाठादेव या बगलमार्गावर अपघात वाढू लागले आहेत. त्याची कारणमीमांसा सरकारने करावी. त्या ठिकाणी वाहतूक सिग्नल बसवण्याची गरज आहे. शिवाय वाहतूक पोलिस तेथे तैनात करून अपघाताचे प्रमाण कमी करावे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्‍यात आले असता हा प्रकार त्‍यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यावेळी त्यांनी आर. के. पांडे हे तज्‍ज्ञ अधिकारी गोव्यात पाठवले होते. त्यांनी साळ नदीतील गाळ उपसणे, आणखी काही साकव बांधून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करणे असे काही उपाय सुचवले होते.

सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता शेते बुडाली आहेत. माझ्या निवासस्थानामागचा भाग तर जलमय झाला आहे, असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

त्‍यावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, सर्वात प्रदूषित अशा साळ नदीतील पाणी पात्राबाहेर पडून ते सकल भागात साचून राहू नये यासाठी उपाययोजना केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT