Pramod Sawant, Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध; मुख्यमंत्र्यांची सभापतींना ग्वाही

Ramesh Tawadkar: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तवडकर यांनी विविध विषयांवर चर्चा केली

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पडझड झाली असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे अथवा रहिवाशांचे नुकसान झाले, त्यांना नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही सभापती रमेश तवडकर यांच्याशी बोलताना दिली.

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत ओएसडी संतोष लोलयेकर, निजी सचिव राजेंद्र बोरकर, धीरज मुरगावकर, लोलयेचे पंच अजय लोलयेकर, श्री दामोदर विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी लोलये-पोळे पंचायतीच्या सध्याच्या हालाखीच्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

यावेळी सभापती रमेश तवडकर यांनी लोलये येथील श्री दामोदर विद्यालयात विद्यार्थी वसतीगृह उभारण्यासाठी आदिवासी विकास योजनेतून सरकारने हातभार लावावा, अशी मागणी केली. यावेळी काणकोणमधील पेयजल पुरवठ्यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ पथक काणकोणात पाठवून देण्याची सूचना सभापतींनी केली.

लोलये पंचायतीला ऑक्ट्रॉय हवा!

लोलये पंचायत क्षेत्रात तीन पेट्रोल पंप आहेत. मात्र, त्यांचा ऑक्ट्रॉय पंचायत तिजोरीत जमा न होता तो सरकारी तिजोरीत जमा होत आहे. त्यामुळे एकेकाळी काणकोण तालुक्यातील श्रीमंत पंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या लोलये-पोळे पंचायतीची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याचे पंच अजय लोलयेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. पंचायतीला ऑक्ट्रॉयचा भाग द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT