Gramin Mitra Dainik Gomantak
गोवा

Goa Gramin Mitra : आता मिळवा एका फोनवर सरकारी सेवा दारात; 'ग्रामीण मित्र' योजनेचा शुभारंभ

एकूण 400 पेक्षा अधिक ग्रामीण मित्र सेवा देणार आहेत

Rajat Sawant

Goa CM Dr Pramod Sawant launched Gramin Mitra : गोवा सरकारने आज केंद्र व राज्य सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा लोकांच्या दारात उपलब्ध करून देण्यासाठी 'ग्रामीण मित्र' हा उपक्रम सुरू केला. या सेवेसाठी 14471 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री. डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते दरबार हॉल राजभवन येथे उपक्रमाच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खवटे उपस्थित होते.

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे ग्रामीण मित्र हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी एकूण 400 पेक्षा अधिक ग्रामीण मित्र सेवा देणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, "ग्रामीण मित्र" उपक्रमाचा शुभारंभ ग्रामीण आणि शहरी गोव्यातील भेद दूर करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ग्रामीण समुदायांना माहिती आणि संधींसह सक्षम करणे आहे. त्यामुळे त्यांचे जीवन बदलू शकते आणि सामाजिक-आर्थिक वाढ होऊ शकते."

"निवडक सरकारी सेवा त्यांच्या दारात आणून रहिवाशांचा वेळ आणि संसाधने वाचवणार आहेत. डिजिटल युगात कोणीही मागे राहणार नाही याची खात्री देतो. ग्रामीण मित्र उपक्रम गोव्यात सार्वजनिक सेवा वितरीत करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणण्यासाठी तयार आहे. त्यामुळे ग्रामीण लोकांना तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा फायदा घेता येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT