CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant बजावणार स्वयंपूर्ण मित्राची भूमिका; सेवा तत्त्वानुसार वाढदिवस करणार साजरा

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्य सरकारने 2 ऑक्टोबर 2020 रोजी महत्त्वाकांक्षी योजना म्हणून सुरू केलेल्या ‘स्वयंपूर्ण मित्र’ योजनेचा सध्या देशभर बोलबाला आहे. या संकल्पनेतून राज्यात अनेक प्रकल्प राबवले जात असून केंद्र व राज्याच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवल्या जात आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सोमवार, 24 एप्रिल रोजी 50 वा वाढदिवस आहे. आपला वाढदिवस ‘हटके’ करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. यंदा ते गोमंतकीय जनतेला ‘स्वयंपूर्ण मित्रा’च्या भूमिकेत दिसतील. गतवर्षी मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त म्हापसा येथील रुग्णालयात हजर राहून रुग्णांची सेवा केली होती, हे विशेष.

केंद्र व राज्य सरकारच्या योजना अंत्योदय तत्त्वावर अखेरच्या घटकापर्यंत पोचवण्याबरोबर पंचायत स्तरावरही विविध योजना मार्गी लागाव्यात यासाठी केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेला समांतर पातळीवर स्वयंपूर्ण मित्र ही योजना बनवली आणि ती गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय पद्धतीने राबवली जात आहे.

राज्यातील 191 पंचायती आणि पणजी महापालिकेसह नगरपालिकांमध्ये 237 स्वयंपूर्ण मित्र नियुक्त केले आहेत. या स्वयंपूर्ण मित्रांच्या योजना मार्गी लागाव्यात आणि तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, यासाठी 25 नोडल अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. या योजनेतील आकडेवारीनुसार राज्यातील 95 टक्क्यांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या हक्काच्या योजना पोचल्या आहेत, हे या योजनेचे यश आहे.

आता मुख्यमंत्री या योजनेतील एक स्वयंपूर्ण मित्र बनले असून त्यांची नियुक्ती साळगाव पंचायतीसाठी केली गेली आहे. तशी अधिसूचना प्रशासनाने काढली आहे.

गाऱ्हाणी ऐकणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे ‘स्वयंपूर्ण मित्र’ या नात्याने 24 एप्रिल रोजी साळगाव पंचायतीमध्ये उपस्थित असतील. यादरम्यान ते साळगाववासीयांच्या समस्या जाणून घेऊन संबंधितांना त्या त्या योजनेचा लाभ मिळवून देतील. शिवाय विविध योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश सुपूर्द करतील, तसेच खते, बियाणे, रोपे इतर कृषी साहित्यांचे वाटप करतील.

पंतप्रधानांकडून योजनेची दखल

या योजनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये गोवा राज्याचे कौतुक केले आहे. या योजनेची फलश्रुती म्हणजे, आता ही योजना आसाम, महाराष्ट्र, गुजरात, मणिपूर, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांनी मान्य करून आपल्या राज्यात तिची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार संबंधित राज्यांतील वरिष्ठ अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी गोेव्यात येऊन प्रशिक्षण घेतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT