Closure Of Tillari Canal Has Been Postponed: तिलारी कालव्याचे 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधी दरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद करण्यात येणार होता.
दरम्यान गोव्यात 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याने कालव्याच्या दुरुस्तीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यावेळी पाण्याची टंचाई भासू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद गोव्याला मिळाले आहे. २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तर गोवा 36 खेळांत सहभागी होणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे तिलारी कालवा बंद करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 8 ते 10 दिवसांत नवीन तारीख जाहीर केली जाईल. कालव्याच्या दुरुस्तीचे काम 15 डिसेंबरपूर्वी संपेल अशी माहिती जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
तिलारी कालव्यातून गोव्याला पाणी पुरवठा होतो. तिलारी कालव्याच्या दुरूस्तीचे काम महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने केले जाणार आहे. मात्र क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामुळे दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले आहे.
तिलारी कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. काही ठिकाणी कालव्याच्या कडा कोसळल्या आहेत. तळदुरुस्ती आणि कालवा बांधणी अत्यावश्यक असल्याने हे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
तर 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर रोजी गोव्यात ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी तब्बल १०,००० हून जास्त क्रीडापटू, ५००० हून अधिक महिला खेळाडू, ४७४० तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. तर ४३ सर्वाधिक खेळ, ७५० क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.