Dance Bar Dainik Gomantak
गोवा

Dance Bar In Goa: कळंगुटमधील बेकायदेशीर डान्सबार तातडीने बंद करा

Dance Bar In Goa: खंडपीठ : बांधकामासंबंधीचे अर्ज निकाली काढा

दैनिक गोमन्तक

Dance Bar In Goa: बांधकाम तसेच भोगवटा (ओक्युपन्सी) परवाना नसलेल्‍या कळंगुट परिसरातील 13 पब व रेस्टॉरंट्समध्ये डान्सबार सुरू आहेत.

त्यांच्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘कन्सेट टू ऑपरेट’ परवाना नसल्यास ते मंडळाने बंद करावेत.

तसेच कळंगुट पंचायतीने सात बांधकामे पाडण्याचा आदेश दिला होता. त्यास बांधकाममालकांनी आव्हान दिलेले अर्ज पंचायत संचालकांनी लवकरात लवकर निकालात काढावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. तसेच या जनहित याचिकेवरील सुनावणी येत्या 8 जानेवारीला ठेवली आहे.

सुदेश मयेकर व कुंदन केरकर यांनी जनहित याचिका सादर केली असून कळंगुट परिसरात बांधकाम परवाना नसताना अनेक आस्थापने उभारण्यात आली असून त्यातून डान्सबार सुरू आहेत असे म्‍हटले आहे.

हे बेकायदा डान्सबार त्वरित बंद करण्याची मागणी त्‍यांनी याचिकेत केली आहे. डान्सबारचालकांकडे पंचायत तसेच सरकारच्या इतर यंत्रणांची परवानगी नाही.

त्यामुळे सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे, असेही याचिकेत नमूद करण्‍यात आले आहे.

बांधकाम पाडण्याचा आदेश जारी केल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यासाठी पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा दावा पंचायतीने केला.

त्यावेळी खंडपीठाने या बांधकामांपुरतीच नव्हे तर इतरांविरोधात कारवाई सुरू केली आहे का, असा प्रश्‍न विचारून पंचायतीची कानउघाडणी केली.

तसेच बेकायदा बांधकामांबाबत पंचायत गंभीर असल्यास वेगळी जनहित याचिका सादर करण्याची सूचना केली.

ज्या बेकायदा इमारतींतील पब व रेस्टॉरंट्समध्ये डान्सबार सुरू आहेत, त्यांनी कन्सेट टू ऑपरेट परवाना घेतला आहे की नाही, याची तपासणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी. जर त्यांच्याकडे हा परवाना नसेल तर ते त्वरित बंद करावेत असेही निर्देश दिले आहेत.

13 बेकायदा क्लब व बार

कळंगुट परिसरात नॉर्मा पब, शिल्ड/नेक्स्ट लेवल, मेहफील, डेविल्स क्लब, थ्री किंग्स, क्लब ताओ, 39 स्टेप्स, पोश नोश, छावला दिल्लीवाला, ब्लॅक हार्ट, ट्रोपीकल २४x७, कोड्डा, प्लॅटिनियम लिफ रेस्ट या क्लब तसेच बार ॲण्‍ड रेस्‍टॉरंटमधून बेकायदा डान्सबार सुरू आहेत.

काही डान्सबार चालवणाऱ्यांनी बांधकाम मालकांकडून भाडेपट्टीवर आस्थापने घेतली आहेत. तसेच अबकारी परवानेही घेतले आहेत, असा दावा करण्यात आला आहे.

बेकायदा बांधकामे

बेकायदेशीर डान्सबार ज्या बेकायदेशीर इमारतींत तसेच जागेत सुरू आहेत, त्यातील सात बांधकाममालकांना कळंगुट पोलिसांनी बांधकामे पाडण्याचा आदेश एका वर्षापूर्वी जारी केला होता. त्या आदेशाला त्यांनी पंचायत संचालकांकडे आव्हान दिले होते.

या आदेशाला अंतरिम स्थगिती देऊन हे अर्ज सुनावणीसाठी प्रलंबित आहेत, अशी माहिती कळंगुट पंचायतीने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT