Climate Change Dainik Gomantak
गोवा

खराब हवामानाचा गोव्यातील काजू पीक आणि किनारपट्टीवर परिणाम; पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली मोठी भीती

गोवा राज्य हवामान बदलाच्या कृती आराखड्यानुसार, पूर आणि इतर कारणांमुळे गोव्याची 15% जमीन नष्ट होईल.

Pramod Yadav

Climate Change Impact On Cashew And Beach In Goa: खराब हवामानाचा परिणाम गोव्यातील काजू पिकावर झाला आहे. तसेच, गोव्याच्या किनारपट्टीला देखील धूप होण्याच्या धोका निर्माण झाला आहे.

हवामान बदलाचा परिणाम गोव्यात सहज दिसून येतोय, यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने प्राधान्य द्यावे, अन्यथा राज्याचे आर्थिक नुकसान होईल, असे मत पर्यावरणवादी अभिजित प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

गोवा राज्य हवामान बदलाच्या कृती आराखड्यानुसार, पूर आणि इतर कारणांमुळे गोव्याची 15% जमीन नष्ट होईल. गोव्याने जमीन गमावली तर त्याचा पर्यटनावरही परिणाम होईल, कारण समुद्रकिनारे पाण्यात जातील. ज्या पर्यटन क्षेत्रांवर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे ते आपण गमावू, असेही प्रभुदेसाई म्हणाले.

अर्थव्यवस्था कोलमडली तर आपण काय करणार? 15 टक्के जमीन गमावल्यास किनारपट्टीच्या राज्याचे मोठे नुकसान होईल. समुद्र पातळी वाढल्याने किनारपट्टीची धूप होईल. संपूर्ण किनारी भाग प्रभावित होईल.

हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर देखील परिणाम होत आहे, त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतुदी करून हे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण न केल्यास पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागू शकते.

हवामान बदलाचा परिणाम फळांच्या पॅटर्नवरही झाला असल्याचे त्यांनी सांगितले. हवामानातील बदलामुळे काजू उत्पादन आणि इतर कामांवर परिणाम झाल्याचे अनेक शेतकरी सांगतात. हवामान अनुकूल नसल्याने मासे प्रजननासाठी इतर ठिकाणी जात असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे, असे प्रभुदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT